MNS Chief Raj Thackeray guides party leaders in Pune for upcoming municipal elections Saamtv
महाराष्ट्र

Municipal Elections: राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडवर! महापालिका निवडणुकांसाठी आदेश, कानमंत्र आणि प्लानिंग

MNS Chief Raj Thackeray Guides Party Leaders : महाराष्ट्रातील आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी तयारी करण्याचे निर्देश राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. पुणे दौऱ्यात त्यांनी महानगरपालिका निवडणुकांसाठी सविस्तर नियोजन आणि रणनीतीवर भर दिला.

Bharat Jadhav

  • राज ठाकरे पुणे दौऱ्यावर मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

  • महानगरपालिका निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत.

  • पदाधिकाऱ्यांना निवडणूक लढवण्याची रणनिती सांगितली गेली.

  • मनसे अॅक्शन मोडवर येऊन तयारीला लागली आहे.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत. राज्यातील मनपाकडून प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आल्या आहेत. दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेने अॅक्शन मोडवर आलीय. मनसे प्रमुख राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असून तेथील पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधत त्यांना महापालिका निवडणुकांना कशा पद्धतीने सामोरे जायचे आहे, याचा कानमंत्र दिला.

महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तयारीला लागा. राहुल गांधी यांनी जे मतचोरी संदर्भात आवाज उठवला आहे. त्याबाबत सर्वांनी आपल्या प्रभागात लक्ष देऊन मतदार यादींबाबत जनजागृती करा, असा कानमंत्र देत राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना निवडणुकांचे प्लॉनिग सांगितलं. यावेळी राज ठाकरेंनी इच्छुक उमेदवार कोण आहेत, याची माहिती घेतली. त्यांना प्रभागानुसार कामाला लागण्याच्या सुचना दिल्यात. जे उमेदवार निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत, त्यांनी हात वर करा असं म्हणत राज ठाकरेंनी इच्छुकांची संख्या जाणून घेतली.

मतचोरीच्या प्रकरणाची दखल घेत त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना मतदार याद्यावर काम करण्यास सांगितलंय. त्यावर लक्ष ठेवण्यास सांगितलं. तुम्हाला २० दिवसांची मुदत आहे, त्या दरम्यान मतदार याद्यांची कामे करा, जो उमेदवार हे काम करने त्यांनाच निवडणुकीची संधी देईल, असं राज ठाकरे म्हणालेत.

सत्ताधाऱ्यांना निवडणुका होऊ द्यायच्या नाहीत. त्यामुळे यावर्षात महापालिकेच्या निवडणुका होतील की नाही ते माहिती नाही. त्यामुळे जेव्हा निवडणुका होतील त्यावेळी तुमची तयारी असली पाहिजे. तसेच शहरांच्या प्रश्नांवर पदाधिकाऱ्यांनी काम करावं, असे आदेश राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिलेत.

यावेळी पदाधिकाऱ्यांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले, मी २०१६ , १७ पासून बोलतोय या मतांमध्ये गडबड आहे. या गोष्टीसाठी शरद पवार ,ममता बॅनर्जी यांना भेटलो. पण त्यांनी आयत्या वेळी खच खाल्ली. तेव्हा त्यांना लोकसभेवर बहिष्कार टाका तेव्हा जागतिक बातमी होईल. बाहेरच्या देशातून दबाव येईल, तेव्हा यांना जाग येईल. तेव्हा त्यांनी आयत्यावेळी माघार घेतली. आता राहुल गांधी यांनी प्रकरण बाहेर काढले आहे. त्यामुळे मतदार याद्यांमध्ये जो घोळ झालेला आहे त्या संदर्भात सर्वांनी लक्ष द्यावे. त्याबाबत सर्वांनी आपल्या प्रभागात लक्ष देऊन मतदार यादींबाबत जनजागृती करा.

बहुमत असूनही सन्नाटा का?

राज्यातील विधानसभेत महायुतीला बहुमत मिळालं होतं. त्यावरून राज ठाकरेंनी भाजपला टार्गेट केलं. भाजप मतांची चोरी करत हे सत्तेवर आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप १३२, शिंदे गट ५६ आणि अजित पवार गटाला ४२ जागा मिळाल्या होत्या. याची टोटल पाहिली तर त्यांना २३२ जागा मिळाल्या होत्या. इतकं मोठं बहुमत मिळूनही राज्यात सन्नाटा होता. याच कारण जे विजयी झालेत त्यांना पचत नव्हतं. जे पराभूत झालेत त्यांनी पचत नव्हतं. हा सगळा मतांचा गोंधळ होता, असं राज ठाकरे म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Honeytrap: PMPML मधील कंडक्टर महिलेचा प्रताप, तिघांना हनीट्रॅपमध्ये अडकवलं, आता स्वतःच अडकली

टॉयलेटमध्ये तासनतास फोन घेऊन बसल्याने होऊ शकतात 'या' आरोग्याच्या समस्या

Maharashtra Live News Update : महायुतीच्या समन्वय समितीची बैठक सुरू

Shirdi Politics : ४ वर्षांपासून प्रचार, ऐनवेळी नगराध्यक्षपदाचे आरक्षण SCसाठी जाहीर; साईबाबांच्या शिर्डीत दिग्गजांचा हिरमोड

हार्दिक पांड्याने खरेदी केली Lamborghini, किंमत वाचून व्हाल थक्क; पाहा photos

SCROLL FOR NEXT