मुंबईमध्ये राज ठाकरेंना शिवीगाळ; परप्रांतीयाने तोडले अकलेचे तारे, व्हिडिओ व्हायरल

Mumbai MNS Viral Video : मुंबई अंधेरीत राज ठाकरे यांना शिवीगाळ करणारा आरोपी सुजित दुबे याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर कठोर कारवाई कऱण्यात यावी, अन्यथा आम्ही धडा शिकवू असा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे.
Mumbai MNS Viral Video
Mumbai Andheri: A migrant youth Sujit Dubey abused MNS Chief Raj Thackeray in a viral video. Police arrested the accused after MNS outrage.Saam TV Marathi News
Published On
Summary
  • मुंबईत परप्रांतीयाकडून राज ठाकरेंना शिवीगाळ, मनसे संतप्त

  • सुजित दुबे अटकेत, राज ठाकरेंना शिवीगाळ प्रकरण तापले

  • अंधेरीत परप्रांतीयाचा माज, राज ठाकरेंना शिवीगाळीचा व्हिडिओ व्हायरल

  • मनसे आक्रमक, राज ठाकरेंना शिवीगाळ करणाऱ्या परप्रांतीयावर कारवाईची मागणी

RAJ THACKERAY ABUSE CASE : मुंबईमध्ये एका परप्रांतीय तरूणाने मनसे प्रमुख राज ठाकरे यांना शिवीगाळ केली. अर्वाच्य आणि खालच्या भाषेत त्याने राज ठाकरेंना शिवीगाळ केली. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. दारूच्या नशेत परप्रांतीय तरूणाने राज ठाकरेंना आई-बहिणीवर शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शिविगाळ कऱणारा तरूण अंधोरी पूर्वमध्ये राहणारा असल्याचे समोर आले आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मनसेकडून प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला आहे. मनसे आक्रमक झाली असून त्या परप्रांतियाला धडा शिकवणार असल्याचे इशारा दिला आहे.

मुंबईच्या अंधेरी पूर्वेत परप्रांतीय तरूणाकडून मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना शिवीगाळ करण्यात आली आहे. दारूचे नशेत मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना आई-बहिणीवर शिवीगाळ केली. शिवीगाळ केल्याच्या व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. राज ठाकरेंना शिवीगाळ करणारा मुजोर तरूण अंधेरी पूर्वत महाकाली रोडवर सुंदर नगर परिसरात राहतो. त्याचे नाव सुजित दुबे असे आहे.

Mumbai MNS Viral Video
Mumbai Goa highway : मुंबई-गोवा महामार्गावरील आजपासून अवजड वाहतूक बंद, ३ टप्प्यात निर्बंध, वाचा सविस्तर

राज ठाकरेंना शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अंधेरीत मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. व्हायरल व्हिडिओचा दाखल घेत एमआयडीसी पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ शिवीगाळ करणाऱ्या परप्रांतीय दुबेला ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

Mumbai MNS Viral Video
Nagpur : गावाला जाताना काळाचा घाला, कुलगुरू अन् पत्नीचा जागेवरच मृत्यू, कारचा चक्काचूर

मनसे कार्यकर्त्यांनी एमआयडीसी पोलिसांना भेटून आरोपी विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली. त्यासोबत शिवीगाळ करणारा आरोपीचे तीन अनाधिकृत धंद्यावर देखील कारवाई करण्याची केली मागणी. जर एमआयडीसी पोलिसांकडून शिवीगाळ करणारा आरोपी विरोधात कठोर कारवाई केली गेली नाही तर पोलीस स्टेशन बाहेर आंदोलन करण्याचे मनसेकडून इशारा देण्यात आला आहे.

Mumbai MNS Viral Video
चाकरमानी' नव्हे तर 'कोकणवासीय'! संबोधनात लवकर बदल, Ajit Pawar यांचे निर्देश

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com