MLC Election Saam Tv
महाराष्ट्र

MLC Election: मराठवाडा पदवीधर निवडणुकीत मोठा ट्विस्ट, अब्दुल सत्तारांनी दिली पवारांच्या उमेदवाराला साथ

Marathwada Graduates Constituency: मराठवाडा पदवीधर निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. या निवडणुकीत शरद पवारांच्या उमेदवाराला शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी पाठिंबा दिला.

Priya More
  • मराठवाडा पदवीधर निवडणुकीत अब्दुल सत्तारांचा शरद पवार गटाला पाठिंबा

  • डॉ. प्रतापसिंह पाटील यांना अब्दुल सत्तारांचे समर्थन मिळाले

  • सतीश चव्हाण यांच्या पाठिंब्यावरून महायुतीत वाद सुरू

मराठवाडा पदवीधर निवडणुकीत महायुतीचे उमेदवार असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण यांच्या पाठिंब्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद सुरू झाला होता. आज तो वाद राष्ट्रवादीचे उमेदवार असलेले सतीश चव्हाण आणि मंत्री संजय शिरसाट यांनी एकत्र येऊन संपला असे जाहीर केले. त्याचवेळी शिवसेनेचे माजी मंत्री आणि आमदार अब्दुल सत्तार यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याने खळबळ उडाली.

एकीकडे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पुन्हा सतीश चव्हाण यांना पाठिंबा दिला असताना दुसरीकडे अब्दुल सत्तारांनी मात्र शरद पवारांच्या उमेदवाराला पहिल्या करपसंतीचे मतदान करण्याचे आवाहन केलं. यासाठी सिल्लोडमध्ये मेळावा देखील घेतला. मराठवाडा पदवीधर मतदारसंघात शरद पवार यांच्या पक्षाचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांना प्रथम पसंतीचे मतदान करून विजयी करण्याचे आवाहन माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार यांनी केले.

डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांच्या प्रचारार्थ सिल्लोड येथील शिवसेना भवनात परभणीचे आमदार राहुल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली. यावेळी आमदार अब्दुल सत्तार बोलत होते. उच्चशिक्षित उमेदवार असलेले डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील हे पदवीधरांच्या समस्या आणि विविध अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहतील, असा विश्वास आमदार अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला. डॉ. प्रतापसिंह पाटील यांना प्रथम पसंतीचे मतदान करून विजयी करण्याची जबाबदारी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्वीकारावी आणि त्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी सर्वांना केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत मिळणार : एकनाथ शिंदे

Supreme Court: मुलांनाही इंटरनेट वापरण्याचा मूलभूत अधिकार, बंदी घालता येणार नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

Skin Care: क्लिन आणि ग्लोईंग स्किनसाठी पार्लरच्या महागड्या ट्रिटमेंट कशाला, घरीच वापरा 'हा' फेसपॅक

लग्नानंतर सासरी गेलेल्या मुलीलाही वडिलांच्या जागेवर अनुकंपा तत्वावर नोकरी, हायकोर्टाचा निर्णय नेमका काय?

Car Servicing: ऑथोराइज्ड सर्व्हिस सेंटर की लोकल गॅरेज....कार किंवा बाईक सर्व्हिसिंग कुठे करणे फायदेशीर?

SCROLL FOR NEXT