राजनाथसिंह यांचे वक्तव्य म्हणजे अकलेचे तारे तोडण्याचा प्रकार : मिटकरी  SaamTv
महाराष्ट्र

राजनाथसिंह यांचे वक्तव्य म्हणजे अकलेचे तारे तोडण्याचा प्रकार : मिटकरी

उरली-सुरली इज्जत जर ठेवायची असेल तर शिवाजी महाराजांवर बोलताना थोडा अभ्यास करून बोलावे, अन्यथा महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता भाजपची कबर खोदेल आणि तुम्हाला सुध्दा महाराष्ट्रात येताना दहावेळा विचार करावा लागेल. असे देखील मिटकरी म्हणाले.

जयेश गावंडे

अकोला - राजनाथसिंह यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या व्यक्तव्याबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अभ्यासपूर्ण व्यक्तव्य न करता अकलेचे तारे तोडण्याचा प्रकार करणाऱ्या राजनाथसिंह यांना महाराष्ट्रात येताना विचार करावा लागेल. तसेच महाराष्ट्रातली शिवप्रेमी जनता भाजपची कबर खोदल्याशिवाय राहणार नाही, असा सज्जड दम शिवव्याख्याते तथा आमदार अमोल मिटकरी यांनी राजनाथसिंह यांना आपल्या प्रतिकियेतून दिला आहे.

हे देखील पहा -

मिटकरी म्हणाले, राजनाथसिंह हे जरी देशाचे संरक्षण मंत्री असले तरी फ्रान्सला राफेल खरेदी करताना भारताचे दिवाळे काढले हे अख्या जगाने पाहिले आहे. राजनाथसिंह यांनी काढलेले व्यक्तव्य हे अकलेचे ताडे तोडणारे आहे. मी राजनाथसिंह यांना सांगू इच्छितो की, भाजप अख्या महाराष्ट्रात बदनाम होतोच आहे.

उरली-सुरली इज्जत जर ठेवायची असेल तर शिवाजी महाराजांवर बोलताना थोडा अभ्यास करून बोलावे, अन्यथा महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता भाजपची कबर खोदेल आणि तुम्हाला सुध्दा महाराष्ट्रात येताना दहावेळा विचार करावा लागेल. परत शिवाजी महाराज, शहाजी राजे, जिजामाता जिजाऊ हे एकच कुटुंब आहे. वीरबाजी पासलकर यांनी त्यांना प्रशिक्षण दिले आहे. दादोजी कोंडदेव यांचा त्यांच्याशी संबंध नाही, अशी प्रतिक्रिया अमोल मिटकरी यांनी दिली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

Gold Rate Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या, पण सोनं-चांदी झालं स्वस्त; जाणून घ्या २४k, २२k चे ताजे दर

Shehnaaz Gill Dating RCB Cricketer News: आरसीबीच्या 'या' खेळाडूवर शहनाज गिल फिदा? 'त्या' एका फोटोमुळे रंगल्या अफेअरच्या चर्चा

Actors Wife Money Fraud: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीची मोठी फसवणूक; BMC च्या बड्या अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

High Blood Sugar: ही ७ लक्षणं दिसली तर समजा तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढतंय

SCROLL FOR NEXT