Uday Samant SaamTv
महाराष्ट्र

MLA Uday Samant : शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडला नाही; सामंत यांचं खळबळजनक स्पष्टीकरण

Uday Samant Press Conference : राज्यात महायुतीची सत्ता स्थापन झाल्यावर मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. त्यातच आता आमदार उदय सामंत यांनी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारीची भूमिका स्पष्ट केली आहे.

Saam Tv

एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद म्हणजे मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडला असा अर्थ होत नाही. त्यांनी फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे निर्णय सोपवला आहे, असं मोठं वक्तव्य उदय सामंत यांनी केलं आहे. तसंच न्याय-अन्यायाकडे बघण्यापेक्षा त्यांनी मतदार आणि मतदानाचा आदर करून पंतप्रधान मोदी यांना जो आदर दिला आहे, ते देशाच्या राजकारणात पहिल्यांदाच घडलं आहे, असंही सामंत यांनी म्हंटलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारीवर शिंदे अद्याप ठाम आहेत का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालात बहुमत मिळाल्यानंतर आता राज्याचा मुख्यमंत्री कोण असेल याबाबत महायुतीत खलबत सुरू आहे. काल याबाबत बोलताना एकनाथ शिंदे यांनी भाजप तसंच अमित शहा आणि मोदी जो निर्णय घेतील तो मान्य असेल, असं म्हंटलं होतं. त्यानंतर शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.

आज दिल्लीत भाजपच्या वरिष्ठांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची यासंदर्भात एक बैठकसुद्धा पार पडत आहे. मात्र आज शिंदेसेनेचे आमदार उदय सामंत यांनी त्यापूर्वीच पत्रकार परिषद घेऊन याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

यावेळी बोलताना सामंत म्हणाले की, नरेंद्र मोदी आणि अमित शाह जे निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल, असं म्हणून एकनाथ शिंदे यांनी काल संवेदनशील आणि बाळासाहेबांचा कडवट सैनिक काय असतो हे सगळ्यांना दाखवून दिलं आहे.

राजकारणातला सुसंस्कृतपणा त्यांनी यावेळी दाखवलाय. मात्र याचा अर्थ ते मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही, असं होत नाही. केवळ निर्णयाचे अधिकार पंतप्रधान मोदींना दिलेय, असं स्पष्टीकरण उदय सामंत यांनी दिलं.

उदय सामंत उपमुख्यमंत्री ?

भाजपचा मुख्यमंत्री झाला तर, शिवसेनेकडून उपमुख्यमंत्रिपदासाठी उदय सामंत किंवा दादा भुसे यांच्या नावाची चर्चा रंगली आहे. यावर बोलताना, टीव्हीवर काय बातम्या येतात त्याचा माझ्याशी काहीही संबध नाही. माझ्या राजकीय जीवनाचं काय करायचं, याचा मी सर्व अधिकार एकनाथ शिंदेंना दिला आहे.

आमचे काही राजकीय निर्णय देखील घेण्याचे अधिकार आम्ही शिंदेंना दिले आहेत. मी एकनाथ शिंदेंसोबत होतो, आहे आणि भविष्यात देखील राहणार, असं यावर बोलताना सामंत यांनी म्हंटलं आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घराच्या दरवाज्यांना कोणता रंग द्यावा?

GK: ४,००० किमीचा प्रवास! देशातील सर्वात लांब महामार्ग कोणता?

EPFO New Scheme : EPFO ची नवी योजना, १ लाखांपर्यंत पगारदारांना १५ हजारांचा फायदा! ३० एप्रिलपर्यंत नोंदणीची संधी |VIDEO

Maharashtra Live News Update: माधवी खंडाळकर अजित पवारांच्या भेटीला

Shraddha Kapoor: बॉलिवूडच्या 'स्त्री'ची हॉलिवूडमध्ये एन्ट्री; डिस्नेच्या 'या' चित्रपटात करणार श्रद्धा कपूर

SCROLL FOR NEXT