महाराष्ट्र

एका पिंपळाच्या झाडाच्या पुनर्वसनाच्या प्रेरणेतून सांगलीत घडली हरित चळवळ: आमदार सुहास बाबर

Sangli’s Tree Army Gains Momentum: “ट्री आर्मी” ही पर्यावरण संवर्धनासाठी सुरू करण्यात आलेली हरित चळवळ असून पिंपळाच्या झाडांचे पुनर्वसन करण्यावर भर दिला जात आहे. खानापूर तालुक्यातील आमदार सुहास बाबर यांच्या पुढाकारातून या मोहिमेची सुरुवात झाली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सांगली जिल्ह्यात सध्या एका आगळ्यावेगळ्या हरित चळवळीची जोरदार चर्चा सुरू आहे. खानापूर तालुक्यात आमदार सुहास बाबर यांच्या पुढाकारातून उभी राहिलेली “ट्री आर्मी” आता हजारो नागरिकांच्या सहभागातून पर्यावरण संवर्धनाची मोठी लोकचळवळ बनत आहे. “कोणतेही पिंपळाचे झाड तोडू नका, त्याऐवजी त्याचे पुनर्वसन करा,” या साध्या पण प्रभावी संकल्पनेतून या उपक्रमाची सुरुवात झाली.

आमदार सुहास बाबर यांनी सांगितले की, रस्त्याच्या कडेला किंवा अडचणीच्या ठिकाणी उगवलेली पिंपळाची झाडे तोडण्याऐवजी त्यांचे पुनर्स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि त्यातूनच या हरित मोहिमेचा जन्म झाला. समाजमाध्यमांवर या उपक्रमाची माहिती प्रसारित होताच त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. हजारो नागरिक स्वयंप्रेरणेने या मोहिमेत सहभागी झाले असून जागा उपलब्ध करून देणे, पाणी देणे, झाडे पुरवणे आणि श्रमदान करणे अशा स्वरूपात लोक मदतीला पुढे येत आहेत.

दिवंगत आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या पर्यावरणप्रेमाचा वारसा पुढे नेताना सुहास बाबर यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या ७८ हजारांहून अधिक मताधिक्याइतकी झाडे मतदारसंघात लावण्याचा निर्धार केला आहे. त्यांनी आपल्या मातोश्रींच्या श्राद्धदिनी तब्बल ५३०० आंब्याची कलमे लावल्याची माहिती दिली. तसेच विटा नगरपालिकेतील एका नगरसेवकाने चार वर्षे वाढवलेली ५२ झाडे या मोहिमेला भेट दिली, तर आळसंद ग्रामपंचायतीने ५०० झाडांचे रोपण केले आहे.

या उपक्रमाला सांगली जिल्हा प्रशासन आणि वन विभागाचाही पाठिंबा मिळत असून, एक एकर जागेत जपानी पद्धतीचे “मियावाकी जंगल” विकसित करण्याची तयारी सुरू आहे. गायरान जमिनी, रस्त्यालगतची मोकळी जागा आणि गाव परिसरात महाराष्ट्राच्या मातीत नैसर्गिकरित्या वाढणारी वड, पिंपळ, बहावा, करंज, चिंच यांसारखी डेरेदार झाडे लावण्यावर भर दिला जात आहे.

पूर्वी सांगली जिल्ह्यात अनेक रस्त्यांवर दिसणारे हिरवेगार “ग्रीन टनेल” महामार्ग रुंदीकरणामुळे नष्ट झाले. आता हेच हरित बोगदे पुन्हा निर्माण करण्याचे ध्येय ट्री आर्मीने ठेवले आहे. येत्या ५ जून रोजीच्या वसुंधरा दिनानिमित्त मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण आणि संवर्धन मोहिम राबवली जाणार आहे. नोकरी किंवा व्यवसायानिमित्त गावापासून दूर गेलेल्या नागरिकांनी पुन्हा आपल्या मातीत आणि गावाशी नाळ जोडण्यासाठी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार सुहास बाबर यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Firing: हिरावाडीतील ज्वेलर्सच्या दुकानात गोळीबार, परिसरात भीतीचं वातावरण

Kalyan Crime: गार्डनमध्ये बसलेल्या तरुण-तरुणीवर जीवघेणा हल्ला, ४ ते ५ जणांनी मारहाण करत डोक्यात दारूच्या बाटल्या फोडल्या

Maharashtra News Live Update: नाशिकच्या हिरावाडी परिसरात ज्वेलर्सच्या दुकानात गोळीबार

Supreme Court: शेअरिंग कार, २ दिवस व्हर्च्युअल हेरिंग; इंधन बचतीच्या आवाहानानंतर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

तुम्ही कूलर वापरताय? सावधान ! कूलरनं घेतला चिमुकल्याचा बळी

SCROLL FOR NEXT