Shahaji Bapu Patil Saam Tv
महाराष्ट्र

शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आमदार शहाजीबापू पाटील यांचं मोठं विधान, म्हणाले...

आमदार शहाजीबापू पाटील यांनी माध्यमांशी बोलताना मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

साम टिव्ही ब्युरो

संभाजी थोरात

कराड : महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार (Maharashtra Government) स्थापन झाल्यापासून (eknath shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा कारभार चालवत आहेत. पंरतु, मंत्रिमंडळ विस्तार अद्यापही झाला नसल्याने विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. मिश्लिक टीपण्णी करुन विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवारही (Ajit Pawar) शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधत आहेत. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे गटातील आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले निर्णय अजित पवार यांनी माध्यमांसमोर मांडावेत, असा खोचक टोला पाटील यांनी पवार यांना लगावला आहे.

माध्यमांशी बोलताना पाटील पुढे म्हणाले, ईडी कोणालाही अटक करु शकत नाही. जर संजय राऊत निर्दोष आहेत, असं त्यांचे बंधू सुनिल राऊत यांचं म्हणणं आहे. पण ते न्यायालयासमोर निर्दोष असल्याचं सिद्ध का करु शकले नाहीत. जे जगासाठी तेच तुमच्यासाठी. तुम्ही स्वतः स्पेशल केस आहेत, असं समजू नका, असा सल्लाही पाटील यांनी राऊत यांना दिला आहे.

तसेच पुढे बोलताना अजित पवार यांच्यावरही पाटील यांनी टीका केली. सुधाकर नाईक यांच्यावेळी बंड केले होते. पावणे दोन महिने मंत्रालय बंद होतं आणि अजित पवार त्यावेळी राज्यमंत्री होते. तेव्हा कारभार चांगला चालला होता, असं म्हणत पाटील यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solar Eclipse: सूर्यग्रहणाच्या वेळी कोणत्या चुका करु नये?

Maharashtra Live News Update: पुण्यात पावसाचा कहर, बंगळूर-पुणे विमान मुंबईच्या दिशेने वळवले

Pune Crime: साईड नाही दिली, भररस्त्यावर घायवळ गँगच्या लोकांनी घातली गोळी

Hair Care Tips: बदलत्या हवामानामध्ये 'या' चुका टाळा, अन्यथा तुमचे केस गळणे कधीच थांबणार नाही

Adani Group News : हिंडनबर्ग प्रकरणी अदानी ग्रुपला सेबीकडून क्लीन चिट, गौतम अदानी म्हणाले...

SCROLL FOR NEXT