इराणमध्ये खोमेनींची सत्ता धोक्यात, देशातील जनता का उतरली रस्त्यावर

Iran On The Brink: बांग्लादेश आणि नेपाळप्रमाणे इराणमध्येही सत्तांतराचे वारे वाहू लागले आहेत. देशभरात सलग आठवडाभर सरकारविरोधात निदर्शनं सुरू असून, ही आंदोलनं आता उग्र स्वरुप धारण करताना दिसतायेत. रस्त्यांवर उतरलेले नागरिक थेट इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्लाह अली खामेनी यांच्या विरोधात घोषणाबाजी करतायेत.. या आंदोलनांमध्ये मोठ्या प्रमाणात युवक आणि महिलांचा सहभाग पाहायला मिळतोय. 2022 नंतर उसळलेल्या आंदोलनानंतरचं हे सर्वात मोठं जनआंदोलन मानलं जातंय.
Protesters gather on the streets of Iran, raising anti-government slogans amid rising inflation and economic hardship.
Protesters gather on the streets of Iran, raising anti-government slogans amid rising inflation and economic hardship.Saam Tv
Published On

दक्षिण इराणमधल्या फार्स प्रांतातलं हे दृश्य...इराणी जनतेचा हा संताप आहे इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्लाह अली खामेनी यांच्यावर...इथल्या फासा शहरात आंदोलकांनी सरकारी इमारतीत घुसण्याचा प्रयत्न केला. फासा येथील गव्हर्नरेट कार्यालयाचं गेट तोडण्याचाही प्रयत्न करण्यात आला. याशिवाय, खुजेस्तान प्रांतातील रामहोर्मोज शहरात स्थानिक गव्हर्नरशिपवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न झाला. काही ठिकाणी तर सरकारी कार्यालयांना आग लावण्याचे प्रयत्नही करण्यात आले.या घटनांमुळे सरकार आणि सुरक्षा यंत्रणांची चिंता वाढलीय.

या आंदोलनाची सुरुवात राजधानी तेहरान येथून झाली. सगळ्यात आधी दुकानदारांनी निषेध व्यक्त करत दुकाने बंद ठेवली. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत इराणी चलन रियाल ऐतिहासिक नीचांकी पातळीवर घसरल्यानं महागाई प्रचंड वाढलीय. यामुळे सामान्य जनतेचं जगणं कठीण झालं असून, हाच या आंदोलनांचा मुख्य केंद्रबिंदू ठरला आहे. यानंतर आंदोलनाची धग देशभर पसरली. तेहरानमध्ये विद्यार्थ्यांनी निदर्शनं केली, तर इस्फहान, यज्द आणि जंजान इथलं विद्यापीठं आणि शैक्षणिक संस्थांमध्येही असंतोष व्यक्त करण्यात आला.

इराणमध्ये जनता का उतरली रस्त्यावर?

इराणची अर्थव्यवस्था सध्या गंभीर संकटात आहे. उपलब्ध माहितीनुसार, डिसेंबरमध्ये देशातील महागाई दर तब्बल 42.2 टक्के इतका होता. अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वर्षभरात सुमारे 72 टक्क्यांनी वाढल्या आहेत. औषधं आणि आरोग्य सेवांच्या खर्चात 50 टक्क्यांपर्यंत वाढ झालीय. या सर्वांवर कळस म्हणजे, इराणी रियाल घसरून एका अमेरिकन डॉलरमागे सुमारे 14.2 लाख रियाल या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचलाय. या परिस्थितीमुळे संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले असून, अनेक शहरांमध्ये मोबाइल व इलेक्ट्रॉनिक्स दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.

महागाईव्यतिरिक्त, इराणमध्ये तीव्र पाणीकपातही जनतेच्या रोषाला कारणीभूत ठरलीय. एका अहवालानुसार, देशातील 20 हून अधिक प्रांत अनेक महिन्यांपासून पाण्याच्या तीव्र टंचाईला सामोरं जातायेत. देशभर पसरलेल्या या आंदोलनांमुळे आयतुल्लाह अली खामेने यांच्या सत्तेला धोका निर्माण झालाय. आता खोमेनी या आव्हानाचा सामना कशाप्रकारे करतात हेच पाहायचंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com