Manasvi Choudhary
कुरकुरीत बटाटा फ्राय सर्वांच्या आवडीचा पदार्थ आहे. कुरकुरीत बटाटा फ्राय करण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
बटाटा फ्राय करण्यासाठी बटाटे, तेल, हळद, जिरे, मसाला, धना पावडर, मीठ, कोथिंबीर हे साहित्य एकत्र करा.
बटाटे फ्राय करण्यासाठी सर्वात बटाटे सोलून त्याच्या पातळ चकत्या करून घ्या. या बटाट्याच्या फोडी स्वच्छ पाण्यात धुवा.
एका प्लेटमध्ये कुरकुरीत बटाटे करण्यासाठी मसाला तयार करा. प्लेटमध्ये हळद, मसाला, मीठ, धनापावडर हे मिक्स करा.
तयार मसाल्याच्या मिश्रणात कापलेले बटाटे मिक्स करा. मिश्रण बटाट्यांना व्यवस्थित लावा.
गॅसवर पॅनमध्ये गरम तेलामध्ये जिरे घाला जिरे तडतडल्यानंतर त्यावर मसाला बटाटे एक एक करून सोडा
बटाटे दोन्ही बाजूंंनी कुरकुरीत होतील असे फ्राय करा नंतर त्यावर कोथिंबीर घाला.