तरुणी पडली AI च्या प्रेमात, AIसोबत बांधली लग्नगाठ

AI Wedding in Japan: सध्याच्या जमान्यात कोण काय करेल याचा नेम नाही? सध्याचं युग हे AIचं युग आहे. मात्र एक तरुणी या AIच्या इतकी प्रेमात पडली की, तिने चक्क AIसोबत लग्नच केलं. कुठे घडलाय हा प्रकार
A Japanese woman poses during her symbolic wedding ceremony with an AI chatbot named Claus.
A Japanese woman poses during her symbolic wedding ceremony with an AI chatbot named Claus.Saam Tv
Published On

चॅट जीपीटी या आर्टिफिशयल इंटेलिजन्सशी एका जपानमधील महीलेनं लग्न केल्याचा प्रकार समोर आलाय. ही घटना आहे जापानमधील योकायामा या शहतराती..32 वर्षीय युरीना नोगोचीनं नटून थटून चॅटजिपीटीशी लग्न केलय. या चॅटजिपीटीमधील नवऱ्याला युरीनाने क्लाऊस असं नाव दिलय. या क्लाऊसला मोबाईलच्या स्क्रिनवर ठेवण्यात आलं होतं आणि एका ट्रेमधून त्याला विवाहस्थळी आणण्यात आलं. यावेळी युरीन वधूचा पारंपारीक ड्रेस परिधान करुन नटून थटून विवाहस्थळी उपस्थित होती. चष्मा घालून युरीनने लग्नाचे विधी पार पाडले.

क्लाऊसबरोबर लग्न करताना युरीनाने एआर चष्मा घातला होता. हा चष्मा घालून युरीनाने लग्नाचे विधी पार पाडले. त्यानंतर AI नं तयार केलेली लग्नाची प्रतिज्ञाही युरीनाने म्हटली. क्लाऊस AIनेही आपलं प्रेम यावेळी जाहीर केल. या दोघांनी लग्न तर केलंय, पण जपानच्या कायद्यात अशा लग्नाची कोणतीही तरदूत नाही. त्यामुळे हे लग्न बेकायदेशीर ठरणार आहे. आता पुढे काय होते हे पाहण महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com