Parbhani : आई, मावशीसह काकाचा ३ वर्षांपूर्वी जीव घेतला, आता आरोपीनं तुरुंगातील टॉयलेटमध्ये स्वतःलाच संपवलं

Parbhani Prisoner Sucide In Jail : परभणी जिल्हा कारागृहात २०२२ मधील तिहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपीने आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे कारागृहातील सुरक्षा व कैद्यांच्या मानसिक आरोग्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
Parbhani : आई, मावशीसह काकाचा ३ वर्षांपूर्वी जीव घेतला, आता आरोपीनं तुरुंगातील टॉयलेटमध्ये स्वतःलाच संपवलं
Parbhani Prisoner Sucide In JailSaam Tv
Published On
Summary
  • तिहेरी हत्याकांडातील आरोपीची जेलमध्ये आत्महत्या

  • शौचालयात शालीने गळफास घेऊन आत्महत्या केली

  • याआधी आत्महत्येचा प्रयत्न झाला होता, मात्र यावेळी तो जीवघेणा ठरला

  • कारागृह सुरक्षा आणि कैद्यांच्या मानसिक आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित

विशाल शिंदे, परभणी

परभणी जिल्हा कारागृह पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. तिहेरी हत्याकांडातील मुख्य सूत्रधार असणाऱ्या आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपीने कारागृहाच्या शौचालयामध्ये शालीने गळफास घेतल्याचे वृत्त आहे. दरम्यान कैद्याच्या आत्महत्येने कारागृह परिसरात खळबळ उडाली असून कैद्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. मृत कैद्याचे नाव राजू गोविंदराव अडकिने (Raju Adkine) आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत कैदी राजू गोविंदराव अडकिने याने २०२२ साली त्याच्याच कुटुंबातील आई, मावशी आणि मावशीचा नवरा या तिहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपी होता. आज पहाटेच्या सुमारास राजूने बॅरेक क्रमांक १ मधील शौचालयात शालच्या साहाय्याने आत्महत्या केल्याचे रात्रपाळीवरील कारागृह पोलिसांच्या लक्षात आले. तत्काळ वरिष्ठ अधिकार्‍यांना याबाबत माहिती देण्यात आली.

Parbhani : आई, मावशीसह काकाचा ३ वर्षांपूर्वी जीव घेतला, आता आरोपीनं तुरुंगातील टॉयलेटमध्ये स्वतःलाच संपवलं
Shocking : खांबावर चढून विजेच्या वायरला पकडलं, क्षणात तरुणाचा कोळसा झाला; मध्य प्रदेशच्या कामगाराची नांदेडमध्ये आत्महत्या

घटनेची माहिती मिळताच न्यायाधीश,कारागृह अधीक्षक, पोलीस व महसूल प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली.मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे कारागृहातील सुरक्षा व कैद्यांच्या मानसिक आरोग्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.या कैद्याचे मानसिक स्वास्थ्य ठीक नव्हते या अगोदरही त्याने अशाच पद्धतीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यावेळी त्याचा जीव वाचला होता परंतु दुसऱ्या वेळी मात्र त्याचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com