MLA Satish Chavan Expelled from Ncp Ajit Pawar Party Saam Tv
महाराष्ट्र

Who Is Satish Chavan: ऐन निवडणुकीत अजित पवार गटाने आमदाराला केलं निलंबित, कोण आहेत ते? वाचा...

Satish Kengar

ऐन निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाने एक मोठा निर्णय घेत आपल्याच पक्षातील आमदार सतीश चव्हाण यांना निलंबित केलं आहे. जाणीवपूर्वक पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे आणि पक्षशिस्त मोडल्याचे सांगत अजित पवार गटाने चव्हाण यांना पक्षातून सहा वर्षासाठी निलंबित केलं आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी माहिती दिली आहे.

त्यांचं निलंबन करताना पक्षाच्या वतीने सांगितलं आलं आहे की, ''१५ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुती सरकारच्या विरोधात प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूने जाणीवपूर्वक पक्षविरोधी भूमिका छत्रपती संभाजीनगरचे आमदार सतीश चव्हाण यांनी घेतली होती. वास्तविक सर्व समाजघटकांना न्याय देण्याची भूमिका महायुती सरकारच्या कार्यकाळात घेतलेली आहे. असे असताना आमदार सतीश चव्हाण यांनी जाणीवपूर्वक शिस्तभंग केलेला असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

कोण आहेत आमदार सतीश चव्हाण?

सतीश चव्हाण हे अजित पवार गटाचे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार आहेत. ते मराठवाडा कृषी विद्यापीठ कार्यकारी परिषदचे सदस्य देखील राहील आहेत. तसेच ते मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी सदस्य देखील होते. त्यांनी आजवर अनेक पदं भूषवली आहेत. दरम्यान, सतीश चव्हाण हे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

चव्हाण यांनी गेल्या दोन वर्षापासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघातून लढण्याची तयारी सुरु केली आहे, असं सूत्रांचं म्हणणं आहे. राज्यात निवडणूक जाहीर झाल्यानंतर महायुती सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढत चव्हाण यांनी पत्रक काढलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. आता सतीश चव्हाण हे लवकरच तुतारी फुंकणार, असं सूत्रांचं म्हणणं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: शरद पवार गटाची सोमवारी ८० उमेदवारांची यादी जाहीर होणार

Mumbai Local train : मध्य रेल्वेवर मोठा अपघात! लोकलचा डबा रुळावरून घसरला; प्रवाशांचे हाल

Eknath Shinde : CM शिंदे थोडक्यात बचावले; हेलिकॉप्टरची करावी लागली इमर्जन्सी लँडिंग, नेमकं काय घडलं?

Maharashtra Politics: ठाकरे-काँग्रेसचं फाटलं? पत्रकार परिषदेत मविआतला विसंवाद चव्हाट्यावर; VIDEO

Sillod Politics : सिल्लोडमध्ये मंत्री अब्दुल सत्तार यांची एकाहाती सत्ता कोण भेदणार? महाविकास आघाडीकडून कोणाची तयारी? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT