jayakwadi dam saam tv
महाराष्ट्र

Jayakwadi Dam : नाशिक, नगर विरुद्ध मराठवाडा पाणी संघर्ष पेटणार? (पाहा व्हिडिओ)

नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये आधीच कमी पाणीसाठा असताना जायकवाडीला पाणी का? असा सवाल शेतकरी करु लागले आहेत.

अभिजीत सोनावणे

Nashik News : नाशिक आणि नगर जिल्ह्यातील धरणांमधून आज (मंगळवार) जायकवाडीसाठी (Jayakwadi Dam) पाणी सोडण्यात येणार आहे. दोन्ही जिल्ह्यातील धरणांमधून ८.६० टीएमसी इतके पाणी साेडले जाणार आहे. दरम्यान नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांनी पाणी सोडायला विरोध दर्शविला आहे. (Maharashtra News)

नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरण समूहातून ०.५ टीएमसी, दारणा समूहातून २६४३ टीएमसी तर नगर जिल्ह्यातील मुळा धरण समूहातून २०१० टीएमसी आणि प्रवरा धरण समूहातून ३०३६ टीएमसी पाणी जायकवाडीसाठी सोडण्याचा निर्णय झाला आहे. आज दुपारनंतर कधीही होणार पाण्याचा विसर्ग हाेऊ शकताे.

हे पाणी सोडल्यानंतर कुठेही पाण्याची चोरी होऊ नये, यासाठी आवश्यकतेनुसार पोलीस बंदोबस्त तसेच वीज पुरवठा बंद ठेवणार आहे. तसेच नदी पात्रातील पाण्याच्या मोटारी देखील काढण्याच्या सूचना प्रशासनाने शेतक-यांना केल्या आहेत.

दरम्यान नाशिक आणि नगर (nagar) जिल्ह्यातील धरणांमध्ये आधीच कमी पाणीसाठा असल्याने पाणी सोडायला लाेकप्रतिनिधींचा तसेच शेतक-यांचा विरोध होऊ लागला आहे. जायकवाडीसाठी पाणी सोडणार पाणी सोडण्यावरून नाशिक, नगर विरुद्ध मराठवाडा संघर्ष पेटण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत.

जिल्ह्यातील धरणांमध्ये आधीच कमी पाणीसाठा असताना जायकवाडीला पाणी का? संतप्त शेतकऱ्यांनी सवाल उपस्थित केला आहे. आधीच पाण्याअभावी आमची पिक जळून जाण्याच्या मार्गावर असताना आमचं पाणी हिरावून मराठवाड्याची तहान भागवण्याचा निर्णय अन्यायकारक असल्याचे शेतक-यांचे म्हणणे आहे.

नाशिकच्या धरण समूहातून मराठवाड्याला पाणी सोडण्यास आमदार सरोज अहिरे यांनी विरोध दर्शविला आहे. पाणी मराठवाड्याला दिले तर नाशिककरांना पाणी राहणार नाही असे अहिरे यांनी नमूद केले. त्या म्हणाल्या लोकसंख्येचा विचार करता नाशिककरांना पाणी उन्हाळ्यापर्यंत पुरणार नाही. यामुळे मराठवाड्याला पाणी देण्यास माझा तीव्र विरोध आहे. यासाठी शासन दरबारी प्रश्न मांडणार असल्याचे अहिरे यांनी साम टीव्हीशी बाेलताना नमूद केले.

सर्व लाेकप्रतिनिधी निर्णयाच्या विरोधात ठाम

उद्या मुंबईला जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडे मागणी करणार असल्याचे त्यांनी म्हटले. नाशिकचे सर्व लोकप्रतिनिधी मिळून या निर्णयाच्या विरोधात ठाम उभे राहू आणि पाणी सोडण्यास विरोध करू असे म्हटले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MNS: मराठी भाषेवरून व्यावसायिकानं राज ठाकरेंना डिवचलं; ५ तारखेनंतर करेक्ट कार्यक्रम करणार, मनसे नेत्याचं प्रत्युत्तर

Ind vs Eng : बेन स्टोक्ससोबत भरमैदानात बाचाबाची; रविंद्र जडेजानं सांगितलं नेमकं कारण

Ashadhi Ekadashi Upvas: आषाढी एकादशीला जास्त मेहनत न घेता घरीच बनवा हे ६ सोपे पदार्थ

Hruta Durgule : महाराष्ट्राची क्रश हृता दुर्गुळे सध्या काय करते ?

Jalebi Recipe: घरी आलेल्या पाहुण्यांसाठी ३० मिनिटात बनवा खमंग जिलेबी, नोट करा रेसिपी

SCROLL FOR NEXT