Maratha Aarakshan Andolan : '...तर मराठा आमदार हिवाळी अधिवेशन बंद पाडतील'

मावळ मधील कार्ला येथे ग्रामस्थ मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले आहेत.
mla nilesh lanke
mla nilesh lankesaam tv
Published On

Maval News : मराठा समाजाला आरक्षण (maratha reservation) मिळावे यासाठी सर्व मराठा बांधव एकजूटीने प्रयत्न करीत आहेत. काेणत्याही परिस्थितीत मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी उभारलेला लढ्याला आमचा देखील पाठिंबा आहे. सत्तेत असलाे तरी वेळप्रसंगी अधिवेशन बंद पाडण्याची तयारी आम्हां सर्व मराठा नेत्यांची असल्याचे पारनेरचे आमदार निलेश लंके (mla nilesh lanke) यांनी नमूद केले. (Maharashtra News)

mla nilesh lanke
Ravikant Tupkar News : सरकारने तुमचं ऐकलं नाही तर? रविकांत तुपकर म्हणाले...

राज्यभर मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil) यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभर मराठा कार्यकर्ते उपोषण करत आहेत. मावळ मधील कार्ला येथे देखील ग्रामस्थ मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या ठिकाणी पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी भेट दिली. आमदार निलेश लंके यांची भूमिका समजून घेता यावी यासाठी मावळवासीयांनी त्यांना कोणत्याच प्रकारचा विरोध केला नाही. त्यांना व्यासपीठावर बोलविण्यात आले. यावेळी आमदार लंके यांनी मराठा आरक्षण मिळाले नाही तर सर्व मराठा आमदार हिवाळी अधिवेशन बंद पाडतील असा विश्वास उपोषणकर्त्याना दिला.

Edited By : Siddharth Latkar

mla nilesh lanke
Chandra Grahan 2023 : खंडग्रास चंद्रग्रहण... कोजागरी पौर्णिमा साजरी करावी का? (पाहा व्हिडिओ)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com