Ravikant Tupkar News : सरकारने तुमचं ऐकलं नाही तर? रविकांत तुपकर म्हणाले...

रविकांत तुपकर हे येत्या 1 नोव्हेंबरला शेगाव येथून एल्गार यात्रा काढणार आहेत.
ravikant tupkar
ravikant tupkarSaam tv
Published On

- हर्षदा सोनोने

Akola News : सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना जर सरकारने न्याय दिला नाही तर येणार अधिवेशन कस होईल हे सरकारला दाखवून देऊ असा इशारा शेतक-यांचे नेते रविकांत तुपकर (ravikant tupkar latest marathi news) यांनी सरकारला दिला आहे. तुपकर हे आज अकोला दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. (Maharashtra News)

ravikant tupkar
Sharmila Thackeray News : ...तर तुमची बायकाेच तुमचे लाेणचे करेल : शर्मिला ठाकरे

तुपकर म्हणाले विदर्भ,मराठवाडा खानदेशातील सोयाबीन पट्ट्यातल्या शेतकरी अडचणी सापडला आहे. येल्लो मुजाकमुळे सोयाबीन उत्पादनात घट आली आहे. त्याचबरोबर बोंड आळी मुळे कापसाच्या उत्पादनात सुद्धा घट आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ravikant tupkar
Grampanchayat Election News : ३५ वर्षांत जे क-हाडात घडलं नाही ते डॉ. अतुल भोसलेंनी घडवून आणलं, पृथ्वीराज चव्हाण गटास माेठा धक्का

दुसऱ्या बाजूला पावसात खंड पडल्यामुळे शेतकरी हा चारही बाजूनी अडचणीत सापडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारने एकरी दहा हजार रुपये सरसकट मदत करावी अशी आमची सरकारकडे मागणी आहे.

त्याचबरोबर सोयाबीनला प्रति क्विंटल 9000 आणि कपाशीला साडेबारा हजार रुपये प्रति क्यूँटल भाव दिला पाहिजे कर्जमुक्ती केली पाहिजे, शंभर टक्के पिक विमा मिळाला पाहिजे, रेगुलर कर्ज भरणाऱ्याच्या खात्यात 50 हजार रुपये जमा झाले पाहिजे ह्या व इतर मागण्या घेऊन रविकांत तुपकर यांनी आंदोलन हाती घेतलं असून येणाऱ्या 1 नोव्हेंबरला शेगाव येथील गजानन महाराज यांना नतमस्तक होऊन एल्गार यात्रेला सुरवात करणार आहेत.

सोयाबीन कापूस उत्पादकांची ताकत काय असतें हे सरकारला दाखवून देऊ आणि जर सरकारने ऐकलं नाही तर येणाऱ अधिवेशन हे कसं होईल हे आम्ही सरकारला दाखवून देऊ असा इशारा यावेळी रविकांत उपकर यांनी सरकारला दिला.

Edited By : Siddharth Latkar

ravikant tupkar
Udayanraje Bhosale News : शिवप्रेमींनाे ! प्रतापगड भेट सुखावह होणार : उदयनराजे भाेसले

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com