Santosh Bangar on Jammu-Kashmir Saam TV News
महाराष्ट्र

Santosh Bangar : पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी फक्त एक तास द्या; आमदार संतोष बांगर यांचं PM मोदींना आवाहन

Santosh Bangar on Pahalgam Terror Attack: पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या विरोधात हिंगोली जिल्ह्यात शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी आंदोलन केलं आहे. कळमनुरी शहरात संतोष बांगर यांनी प्रतिकात्मक पुतळा दहन करत पाकिस्तानचा निषेध केला आहे.

Prashant Patil

हिंगोली : पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या विरोधात हिंगोली जिल्ह्यात शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी आंदोलन केलं आहे. कळमनुरी शहरात संतोष बांगर यांनी प्रतिकात्मक पुतळा दहन करत पाकिस्तानचा निषेध केला आहे. यावेळी संतोष बांगर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन करत 'पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताच्या जनतेला एक तास द्या', असं म्हणत या संपूर्ण दहशतवादी हल्ल्याच्या घटनेचा निषेध केला आहे. यावेळी शिवसैनिकांसह नागरिकांची देखील मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

आमदार संतोष बांगर आंदोलन करत म्हणाले की, ' माझ्या हिंदू बांधवांना, जम्मूत झालेल्या भ्याड हल्ल्यामध्ये जे हिंदू त्यात मृत्यूमुखी पडले, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. पहलगाममध्ये आंतकवाद्यांनी जो हल्ला केला, त्याच्यामध्ये पाकिस्तानचे काही आतंकवादी आणि भारतात राहणारे काही आतंकवादी. आपण पाहिल्यानंतर काही जणांनी त्यांची वैयक्तिक जमीन विकली आणि त्याठिकाणी आतंकवादी घटवले. काश्मीरमध्ये राहणारा तो, या भारत देशामध्ये राहतो, या हिंदुस्थानाचं खातो, आणि गुण जर पाकिस्तानचे गात असेल, तर अशा हरामखोर लोकांना या देशामध्ये राहण्याचा अधिकार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना माझी हात जोडून विनंती आहे की, पाकिस्तानंतर जे भारतात राहून आपल्या लोकांवर अत्याचार करताय, आतंकवादी घडवताय, या लोकांना बाहेर काढून गोळ्या घातल्या पाहिजे. आम्हाला फक्त एक तास , आम्ही पण काश्मीरला येतो, आम्ही काही कमी नाही, त्यांना तशाला तसं उत्तर देऊ,' असं म्हणत संतोष बांगर चांगलेच खवळलेले दिसले.

दरम्यान, केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचले असून भयभीत झालेल्या पर्यटकांना सुखरूप घरी पोहचविण्यासाठी विशेष रेल्वे सुविधा उपलब्ध करून देणार आहेत. जम्मू काश्मीमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्यानंतर भयभीत झालेल्या आणि जम्मू-काश्मीरमध्ये अडकून पडलेल्या पर्यटकांची केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी जम्मू-काश्मीरमध्ये जाऊन भेट घेतली. तुम्हाला घरी सुखरुप पोहचविण्यासाठी रेल्वे गाडीची व्यवस्था करण्यात आली असल्याचं त्यांनी पर्यटकांना सांगितलं.

बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास ४९ पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये पर्यटनांसाठी गेलेले आहेत, हे सर्व पर्यटक सुखरुप आहेत. आज केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव हे जम्मू-काश्मीरला गेले असता पर्यटकांसोबत संवाद साधून सरकार 'तुमच्या पाठीशी आहे घाबरू नका...सरकार तुमच्या सोबत आहे...' असं म्हणत त्यांनी पर्यटकांना धीर दिला. आज जम्मू काश्मीरवरून हे पर्यटक दिल्लीकडे रवाना होणार आहेत. दिल्ली येथे आल्यानंतर संबंधित पर्यटकांना त्यांच्या घरी रेल्वेने सुखरुप पोहोचवणार असल्याचं देखील त्यांनी माहिती दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डिसीपीच्या गाडीलाच ठोकलं

पुण्यात मद्यधुंद चालकाचा प्रताप! थेट वाहतूक विभागाच्या डीसीपींच्या गाडीला धडक; मुलगी जखमी

Mrunal-Bipasha: मृणाल बिपाशाच्या वादात हिना खानची एन्ट्री; अभिनेत्री म्हणाली, 'मी अशा चुका केल्या...'

Mumbai Local Mega Block : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक, एक्सप्रेस गाड्यांचा खोळंबा, लोकलवरही परिणाम

भारताला धमकावणारे ट्रम्प रशियाच्या पुतिनसमोर शांत; 'पीसमेकर' प्रतिमेला धक्का, भेटीचा VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT