Mla Sanjay Raimulkar  saam tv
महाराष्ट्र

Shegoan Pandharpur Highway : पालखी मार्ग दुरस्ती करा, अन्यथा रोड ब्लास्ट करू; मुख्यमंत्र्याच्या गटातील आमदारांचा गर्भित इशारा

हिवाळी अधिवेशनात आवाज उठवून देखील दखल घेतली नसल्याची आमदारांना खंत.

संजय जाधव

Buldhana News : पालखी मार्ग दुरस्ती करा अन्यथा रोड ब्लास्ट करू असा गर्भित इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय रायमुलकर यांनी दिला आहे. साम टीव्हीशी बाेलताना आमदार रायमुलकर (Mla Sanjay Raimulkar) यांनी विविध समस्यांबाबत चर्चा देखील केली. (Maharashtra News)

सन 2018 -19 मध्ये जिल्ह्यातील शेगाव ते पंढरपूर हा महामार्ग तयार करण्यात आला. तीन ठेकेदारांच्या कंपन्यांच्या माध्यमातून हा सिमेंट राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यात आला. मात्र हा महामार्ग अजूनही अपूर्ण आहे.

तो पूर्ण बनविला गेला नसून रस्त्यावर मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे असंख्य अपघात होऊन बऱ्याच नागरिकांची जीव गेले आहेत. हा रस्ता मनुष्यचा वध घेणारा रस्ता ठरतोय अशी भावना आमदार रायमुलकर यांनी व्यक्त केली.

300 कोटी रुपये खर्च करून रोड तयार करताना सर्वरस्ते नियम निकष धाब्यावर बसविल्या गेले असून अद्याप पर्यंत रस्ता दुरस्ती केली गेली नाही. मेहेकर येथील सत्तेतील शिंदे गटाचे आमदार संजय रायमुलकर यांनी हिवाळी अधिवेशनात सुद्धा आवाज उठविला होता. तसेच वारंवार अधिकारी व ठेकेदाराकडे तक्रारी केल्या. मात्र त्या तक्रारींची दखल घेतली गेली नाही.

दरम्यान आता एका महिन्यात जर पालखी महामार्गाचे दुरस्तीचे काम केले गेले नाही तर रस्त्यावरील पडलेल्या भेगामध्ये बारूदच्या नळ कांड्या लावून रोड ब्लास्ट करू असा गर्भित इशारा आमदार संजय रायमुलकर यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shukra Gochar 2024: नोव्हेंबर अखेरीस शुक्राचं नक्षत्र गोचर वाढवणार डोकेदुखी; आर्थिक हानी होण्याचा धोका

Air Pollution : राजधानीची हवा अत्यंत विषारी! शाळा बंद, वाहनांना बंदी, दिल्लीमध्ये अनेक निर्बंध

Weather Update : थंडीची चाहूल, कमाल अन् किमान तापमानात घट

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

SCROLL FOR NEXT