KDMC वर धडकला नागरिकांचा हंडा कळशी मोर्चा

या भागात नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून पाणी टंचाईची समस्या भेडसावत आहे.
KDMC News
KDMC Newssaam tv
Published On

- अभिजित देशमुख

Kalyan News : सुरळीत पाणी पूरवठा व्हावा यासाठी आज (गुरुवार) डोंबिवली पूर्व कल्याण शीळ रोड वरील पिसवली टाटा पाॅवर परिसरातील नागरिकांनी केडीएमसी मुख्यालयावर (Kalyan Dombivli Municipal Corporation) हंडा कळशी मोर्चा काढला. या मोर्चात शेकडाे महिला सहभागी झाल्या होत्या. (Maharashtra News)

KDMC News
Bar Council Of India : वकील रणजीतसिंह घाटगे याची सनद रद्द, १४ लाख दंड देण्याचाही हुकूम; जाणून घ्या पक्षकाराची तक्रार

डोंबिवली पूर्व कल्याण शीळ रोड वरील पिसवली टाटा पाॅवर परिसरात सुमारे 7 ते 8 हजार लोकसंख्या आहे. या भागात नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून पाणी टंचाईची समस्या भेडसावत आहे.

KDMC News
Neelam Gorhe On Nitesh Rane : नितेश राणेंच्या 'त्या' आरोपावर निलम गोऱ्हेंचे चोख प्रत्युत्तर

कधी या परिसरात कमी दाबाने पाणी पूरवठा केला जाताे तर कधी अपुरा पाणी पुरवठा केला जाताे. या भागातील नागरिकांनी पाण्याच्या समस्येबाबत अनेकदा पालिका प्रशासनाकडे तक्रार केली आहे.

काही वेळेला आंदोलने देखील झाली आहेत परंतु आश्वासनापलीकडे अद्याप काहीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे आज (गुरुवार) संतापलेल्या नागरिकांनी, महिलांनी ,सामाजिक संस्थांनी केडीएमसी मुख्यालयावर हंडा कळशी मोर्चा काढला. या मोर्चात हंडा कळशी घेऊन महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.

Edited By : Siddharth Latkar

KDMC News
Cyber Crime : 'ऑनलाईन टास्क' ला युवती भुलली, ४ लाख ६७ हजार गमावले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com