Rohit Pawar on Raj Thackeray, Rohit Pawar News Updates  SaamTvNews
महाराष्ट्र

"धर्माच्या नावावर स्वार्थी राजकारण करणाऱ्यांना जनता उत्तर देईल"

मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ आली आहे आणि हेच डोळ्यासमोर ठेवून राज ठाकरे बोलत आहेत - रोहित पवार

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली : धर्माच्या नावावर व्यक्तिगत लाभासाठी करत असाल तर महाराष्ट्रातील लोकं काही उत्तर प्रदेशची लोकं नाहीत, त्यांना सर्व कळते. त्यामुळे धर्माच्या नावावर स्वार्थी राजकारण करणाऱ्यांना जनता नक्कीच उत्तर देईल असा टोला कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज ठाकरेंना (Raj Thackeray) लगावला आहे. (Rohit Pawar on Raj Thackeray)

हे देखील पहा :

मुंबई महापालिकेची (BMC) निवडणूक जवळ आली आहे आणि हेच डोळ्यासमोर ठेवून राज ठाकरे बोलत आहेत. आज सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर बोलण्याची गरज आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. धर्म (Religion) हा वैयक्तिक विषय असून त्यावर व्यक्तिगत स्वार्थापोटी राजकारण करणाऱ्यांना उत्तर मिळेलच असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, २०१९ च्या निवडणुकांवेळी राज ठाकरे भाजपच्या (BJP) विरोधात बोलत होते. पण, आता त्यांची भाषणं ऐकली तर ते भाजपाचेच म्हणणे बोलत आहेत. भाजप पोलखोल यात्रेवर दगडफेक झाली होती, यासंदर्भात पवार म्हणाले, भाजपवाले बऱ्याच यात्रा काढत असतात. त्यांची भूमिका कायम दुटप्पी असते.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Balushahi Recipe: सणासुदीला झटपट बनवा खुसखुशीत आणि पाकात मुरलेली बालूशाही, वाचा रेसिपी

Tomatoes for heart health: हृदयाच्या आरोग्यासाठी टोमॅटो फायदेशीर; पण कच्चा खावा की शिजवून? कार्डिओलॉजिस्टने दिलं उत्तर

Pitru Paksha 2026: श्राद्ध कसं करायचं? पितृ पक्षात कोणते विधी केले जातात? वाचा...

Maharashtra News Live Update: साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण, चौकशी समितीने आणखी 8 आठवड्यांची मुदत मागितली

मनोज जरांगेंना मोठा झटका! निकटवर्तीयावर ४.९० कोटींचा दंड कायम

SCROLL FOR NEXT