Congress MLA Praniti Shinde On Rebel Shivsena MLA Eknath Shinde Saam TV
महाराष्ट्र

ज्या माणसासाठी एवढं केलं त्याच माणसाने उद्धवजींना दगा दिला; प्रणिती शिंदेंचा टोला

Political Crisis In Maharashtra : या सगळ्या प्रकाराबाबत कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनीही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंवर टीक केली आहे.

विश्वभूषण लिमये

सोलापूर: कट्टर शिवसैनिक असलेले एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेविरोधात बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत (Shivsena) उभी फूट पडली आहे. बंडखोरी केल्याने एकनाथ शिंदेंवर मविआ नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यामध्ये दररोज शाब्दिक खटके उडत आहेत, तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शवला आहे. या सगळ्या प्रकाराबाबत कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनीही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंवर टीक केली आहे. "ज्या माणसासाठी एवढं केलं त्याच माणसाने उद्धवजींना दगा दिला, 'घर का भेदी लंका ढाये'" असं म्हणत सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदेने एकनाथ शिंदेवर टीका केली आहे. (Praniti Shinde Slams Eknath Shinde)

हे देखील वाचा -

सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, "ज्या माणसासाठी एवढं केल त्याच माणसाने उद्धवजींना दगा,''घर का भेदी लंका ढाये" अशा शब्दांत त्यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे. त्याचबरोबर प्रणिती शिंदे म्हणाल्या की, हे सरकार काही पडणार नाही. महाविकास आघाडी सरकार आपली टर्म पूर्ण करेल असा विश्वासही प्रणिती शिंदेनी व्यक्त केला आहे. आज सोलापूरमधील रेल्वे स्टेशन परिसरातील महात्मा गांधी पुतळा परिसरात काँग्रेस कडून 'अग्निपथ' योजनेच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले. यामध्ये मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते सामील झाले होते. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

२० जूनला विधान परिषदेच्या मतदानानंतर एकनाथ शिंदे हे नॉट रिचेबल झाले. यानंतर शिवसेनेचे अनेक आमदारही नॉट रिचेबल झाले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आणि शिवसेनेह महाविकास आघाडी अक्षरशः हादरली. सुरुवातीला एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या काही आमदारांसह सुरतमधील एका हॉटेला थांबले होते. त्यानंतर केंद्राच्या सुरक्षेत ते बंडखोर आमदारांसह २२ जूनला आसाम राज्यातील गुवाहाटीत पोहोचले. गुवाहाटीतील रेडिसन ब्ल्यू या हॉटेलात ते बंडखोर आमदारांसह थांबले आहे. आपल्यासोबत शिवसेनेचे ४० तर अपक्ष आणि इतर १० असे एकूण ५० आमदार असल्याचा दावा एकनाथ शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. आज बंडाचा पाचवा दिवस असून रोज नवनवीन घटना घडतायतय.

Edited By - Akshay Baisane

हे देखील पाहा -

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: नाशिक जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार

Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य

Railtel Recruitment: सरकारी कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी;अप्रेंटिस पदासाठी भरती सुरु; पात्रता काय? जाणून घ्या

गौरी खानला शालिनी पासीबद्दल जाणवते चिंता, काय आहे नेमक कारण?

Viral Video: वाह! काटा लगा गाण्यावर लोकलमध्ये प्रवाशांची जुगलबंदी, आजोबांनाही केला हटके डान्स; पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT