शिंदे साहेबांमुळे आम्ही संयम बाळगून; राजकीय प्रश्न सुटला की, जशाच तसे उत्तर देऊ : तानाजी सावंत

पुण्यातील बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची शिवसैनिकांनी तोडफोड केली
Shivsena Tanaji Sawant Pune
Shivsena Tanaji Sawant Pune Saam TV

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलेल्या भावनिक आवाहनानंतरही बंडखोर आमदारांनी आपलं बंड सुरूच ठेवलं आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेचे जवळपास 40 हून अधिक आमदार गुवाहाटी येथे थांबून आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यभरातील शिवसैनिक (Shivsena) आक्रमक झाले आहे. पुण्यातील बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची शिवसैनिकांनी तोडफोड केली आहे. दरम्यान, कार्यालयात तोडफोड केल्यानंतर आमदार तानाजी सावंत यांनी तोडफोड करणाऱ्यांना इशारा दिला आहे. (Pune Shivsena Latest Marathi News)

Shivsena Tanaji Sawant Pune
राजकारणातील सर्वात मोठी बातमी! एकनाथ शिंदे यांच्या गटाचं नाव ठरलं

तान्हाजी सावंत यांनी बंडखोरी केल्यानंतर, शिवसैनिक आक्रमक झाले. संतप्त शिवसैनिकांनी गद्दार सावंत असं म्हणत तानाजी सावंत यांच्या पुण्यातील कार्यालयाची तोडफोड केली. दरम्यान या तोडफोडीनंतर तान्हाजी सावंत यांनी एक फेसबुक पोस्ट करत तोडफोड करणाऱ्यांना इशारा दिला.

"आमचे गटनेते मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही संयम बाळगून आहोत. एकदा हा राजकीय प्रश्न सुटला की येणाऱ्या काळात जशाच तसे उत्तर दिले जाईल. माझी नम्र विनंती आहे प्रत्येकाने आपल्या औकातीत राहावं". अशी पोष्ट तानाजी सावंत यांनी केली आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी जवळपास 40 आमदारांना घेऊन बंड केल्याने शिवसेनेत दोन गट पडले आहेत. अशातच बहुमताचा आकडा घटल्याने महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे. शिंदे 40 हून अधिक आमदारांसह गुवाहाटी येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबले आहेत.

माहितीनुसार एकनाथ शिंदे आता नवा गट स्थापन करणार असून या गटाचं नावही ठरवण्यात आलं आहे. 'शिवसेना बाळासाहेब ठाकरे गट' असं या गटाचं नाव ठरलं असून लवकरच याची अधिकृत घोषणा केली जाईल असं बंडखोर आमदारांकडून सांगण्यात आलं आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com