चिपळूण शहर स्वच्छ करुन मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाची भेट देणार - भास्कर जाधव
चिपळूण शहर स्वच्छ करुन मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाची भेट देणार - भास्कर जाधव Saam Tv News
महाराष्ट्र

चिपळूण शहर स्वच्छ करुन मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाची भेट देणार - भास्कर जाधव

अमोल कलये.साम टीव्ही रत्नागिरी

चिपळूण - महापूरामुळे चिपळूणची दुरावस्था झाली आहे. चिपळूणचा नागरिक उध्वस्त झालाआहे. व्यापार उध्वस्त झाला आहे. चिपळूणकर हताश झालाय. सर्वत्र चिखलाचं साम्राज्य पहायला मिळतय. अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त चिपळूण शहर स्वच्छ करुन सुंदर करुन उद्धव ठाकरे यांना भेट द्यायचा निर्धार भास्कर जाधव यांनी केलाय. त्यासाठी आपल्या गुहागर मतदार संघातील दीड हजार कार्यकर्ते घेऊन ते साफ सफाईसाठी चिपळूणमध्ये उतरले आहेत. ही सर्वात मोठी भेट असेल आणि ती त्यांना आवडेल असं मत आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केलं आहे. (MLA Bhaskar Jadhav Cleaning Chiplun city as a Birthday Gift of CM)

मुखमंत्र्यांनी यापूर्वीच वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन केले होते. ''राज्यावर आलेल्या अस्मानी संकट पाहता, वाढदिवसानिमित्त कुणीही अभीष्टचिंतन करण्यासाठी प्रत्यक्ष भेटू नये तसंच फलक, पोस्टर्स लावू नये. कोकण, पश्चिम महाराष्ट्रावर निसर्ग कोपला असून पूरामुळे मृत्यू झाले आहेत, अनेकांच्या कुटुंबीयांवर आघात झाला आहे. या आपत्तीत महाराष्ट्र शोकाकुल असून कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नये सोशल मीडिया व ई-मेलच्या माध्यमातून आपण शुभेच्छा स्वीकारू.'' असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. त्यानुसार आता आमदार भास्कर जाधव हे चिपळूणमध्ये स्वच्छता मोहिम राबवत आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Water Tree : आंध्रप्रदेशमधलं निसर्गाचं अद्भुत सौंदर्य; चक्क झाडांच्या खोडातून मिळतं पिण्याचं पाणी

Uddhav Thackeray On Narendra Modi | गाईपेक्षा महागाईवर बोला, ठाकरे बरसले

Sunil Tatkare: राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ महायुतीत नाराज? सुनिल तटकरेंनी केला महत्वाचा खुलासा; म्हणाले...

Char Dham Yatra: चारधाम यात्रेदरम्यान रील बनवण्यावर बंदी, व्हीआयपी दर्शनही बंद; सरकारकडून नवा आदेश जारी

Today's Marathi News Live : घाटकोपर होर्डिंग दुर्घटना, तपास गुन्हे शाखेकडे

SCROLL FOR NEXT