Mla Bacchu Kadu  Saam Tv
महाराष्ट्र

Bacchu Kadu On Ministership: बच्चू कडू यांनी मंत्रिपदाचा दावा सोडला, त्यामागचं कारणही केलं स्पष्ट

Baccu Kadu Statement: बच्चू कडू यांनी मंत्रिपदासाठीचा दावा सोडला असल्याचे आज जाहीरपणे सांगितले.

Priya More

प्रमोद जगताप, दिल्ली

Delhi News: अजित पवार यांचा गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (Shinde-Fadnavis Government) सामील झाल्यानंतर प्रहार जनशक्ती पार्टीचे आमदार बच्चू कडू (MLA Bacchu Kadu) यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी मंत्रिपदासाठी (ministerial post) दावा सोडणार असल्याचे सांगितले होते.

पण मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतर त्यांनी आपला निर्णय तात्पुरता मागे घेत १८ जुलै रोजी ठाम भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार आज बच्चू कडू यांनी मंत्रिपदाबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली. बच्चू कडू यांनी मंत्रिपदासाठीचा दावा सोडला असल्याचे आज जाहीरपणे सांगितले.

मंत्रिपदासाठी चर्चे असलेले बच्चू कडू यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, 'सध्या 40-50 आमदार आहेत आणि मंत्रिपद कमी आहेत. यामध्ये सर्वांनाच मंत्रिपद पाहिजे आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची अडचण कमी व्हावी यासाठी मी मंत्रीपदाचा दावा सोडतो. मुख्यमंत्री अडचणीत आहेत. मंत्रिपदासाठी ओढाताण सुरू आहे. मला मंत्रालय दिलंय. त्यामुळं मी मंत्रिपदाचा दावा सोडलाय.'

तसंच, 'आम्हाला तुम्ही मंत्रिमंडळात हवे आहात, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. पण मी त्यांना माझ्याऐवजी आमचे आमदार राजकुमार पटेल यांना मंत्रिपदाची संधी द्या असे सांगितले आहे.', असं बच्चू कडू यांनी सांगितले. यावेळी बच्चू कडू यांनी किरीट सोमय्या यांच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, 'काही गोष्टीचा अतिरेक केला की परिणाम भोगावा लागतो. तो व्हिडिओ मी पाहिला नाही. कोणाच्या व्यक्तिगत जीवनात घुसू नये.

अजित पवार गटाने शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. त्यानंतर या गटातील ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार गट शिंदे-फडणवीस गटामध्ये आल्यामुळे बच्चू कडूंनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर खातेवाटप झाल्यानंतर देखील बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली होती. तेव्हा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली होती. 'राष्ट्रवादी काँग्रेसने व्यवस्थित दबाव आणला आणि यशस्वी झाले.', अशी टीका त्यांनी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dream Psychology: स्वप्नात वारंवार अपघात पाहण्याचे संकेत काय?

Maharashtra Live News Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची बैठक

Mrunal Thakur: तुझं सौंदर्य पाहून चंद्रही लाजेल...

Hidden Gems Maharashtra : भंडारदऱ्याजवळ पाहा Top 7 ठिकाणं, पावसाळ्यातलंं अद्भूत दृश्य

'आयत्या बिळात नागोबा' या म्हणीचा अर्थ काय?

SCROLL FOR NEXT