Rahul Gandhi News: मोदी आडनाव प्रकरणी राहुल गांधींची सुप्रीम कोर्टात याचिका, २१ जुलैला होणार सुनावणी

Rahul Gandhi Modi Surname Case Updates: सुरत न्यायालयाच्या या निर्णयामुळे राहुल गांधी सध्या खासदार राहण्यास किंवा निवडणूक लढविण्यास अपात्र आहेत.
Rahul Gandhi's petition
Rahul Gandhi's petitionsaam tv
Published On

Rahul Gandhi Latest News: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 'मोदी आडनाव' मानहानी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. गुजरात उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात त्यांनी १५ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यांच्या या याचिकेवर तात्काळ सुनावणी घेण्याची मागणी राहुल गांधी यांच्या वतीने त्यांच्या वकीलांनी केली आहे.

राहुल गांधी यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील अभिषेक सिंघवी यांनी 21 जुलै किंवा 24 जुलै रोजी अपीलाची यादी मागितल्यानंतर सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पीएस नरसिंहा आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने याचिकेवर सुनावणी घेण्यास सहमती दर्शवली. न्यायालयाने या प्रकरणावर २१ जुलैला सुनावणी घेऊ असं सांगितलं आहे.

Rahul Gandhi's petition
PM Modi & Yogi Adityanath Death Threat: पीएम मोदी आणि योगी आदित्यनाथ यांना पुन्हा धमकी, मेसेज येताच पोलीस यंत्रणा सतर्क

मोदी आडनावावरून टीका केल्यामुळे सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली होती. त्यानंतर या खटल्यात गुजरात उच्च न्यायालयाने 7 जुलै रोजी राहुल गांधी यांनी शिक्षेला स्थगिती देण्यासाठी केलेली याचिका फेटाळली होती. ट्रायल कोर्टाचा आदेश योग्य असल्याचे गुजरात उच्च न्यायालयाने म्हटले होते.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

राहुल गांधींनी (Rahul Gandhi) 2019 मध्ये मोदी आडनावावरून वादग्रस्त विधान केले होते. याप्रकरणी त्यांच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावर्षी कनिष्ठ न्यायालयाने त्याला दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा सुनावली. सुरत न्यायालयाच्या या निर्णयामुळे राहुल गांधी सध्या खासदार राहण्यास किंवा निवडणूक लढविण्यास अपात्र आहेत. (Tajya Marathi Batmya)

सुरत न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची याचिका गुजरात हायकोर्टाच्या फेटाळून लावली. त्यानतंर हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात राहुल गांधींकडून सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले आहे. (Latest Political News)

Rahul Gandhi's petition
Maharashtra Politics: शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यात नवा पेच! विधानसभा अध्यक्षांच्या नोटिशीला ठाकरे गटाकडून उत्तर नाही

मोदी आडनावाचा प्रकरण काय आहे?

ललित मोदी आणि नीरव मोदी यांचा उल्लेख करत राहुल गांधी यांनी सर्व चोरांचे आडनाव एकच का आहे? त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपचे आमदार आणि गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी त्यांच्याविरुद्ध फौजदारी मानहानीचा खटला दाखल केला. ज्यामध्ये त्यांनी राहुल गांधी यांच्या या वक्तव्यामुळे संपूर्ण मोदी समाजाची बदनामी झाली, असा आरोप केला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com