Abu Azmi News : विधानसभा निवडणुकीनंतर मविआला मोठा धक्का बसलाय. समाजवादी पार्टीने मविआतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहायचं नसल्याचे कारण देत अबू आझमी यांनी हा निर्णय घेतलाय. त्याशिवाय ते विधानसभेत वेगळा गट निर्माण करणार आहेत. साम टीव्हीशी बोलताना अबू आझमी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
एकीकडे विरोध उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर जात आहेत. मारकडवाडी आणि नागपूर अधिवेशनासाठी पुढील दिशा ठरवण्यासाठी विरोधक ठाकरेंन भेटण्यासाठी मातोश्रीवर जात आहेत. दुसरीकडे विधानसभेत शपथ घेतल्यानंतर अबू आझमी यांनी मविआतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय. ठाकरेंचे कारण देत त्यांनी मविआमधून एक्झट होण्याचा निर्णय घेतला आहे.
काय म्हणाले अबू आझमी?
आमदारकीची शपथ घेतल्यानंतर अबू आझमी यांनी मविआतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय. त्यांनी साम टीव्हीला याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले की, मी महाविकास आघाडीमधून बाहेर पडत आहे. शिवसेनेबरोबर आम्ही राहणार नाही. बाबरी मशीदबाबत आमचा अपमान झाला आहे. माझे सर्व आमदार वेगळा गट स्थापन करू. मी आज शपथ घेतली आहे. मी अजित पवार यांनी भेटलो आहे. लवकरच पुढचा निर्णय कळवतो. सध्या तरी मविआतून बाहेर पडत आहे.
आमदारांचा शपथविधी, मविआला धक्का
विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनाला आज मुंबईमध्ये सुरूवात झाली. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विधानसभेचे सदस्य उपस्थित होते. आमदारांच्या शपथविधीचा कार्यक्रम पार पडलाय. विरोधी पक्षाने पहिल्याच दिवशी आक्रमक पवित्रा घेत शपथविधीस नकार देत सभात्याग केला. विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मविआला जोरदार धक्का बसलाय. अबू आझमी यांनी मविआतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.