Miraj-Pandharpur Highway Crash 
महाराष्ट्र

Accident : १८ चाकी ट्रकची महिलांनी भरलेल्या टेम्पोला जोरदार धडक, ३ जणींचा मृत्यू

Miraj-Pandharpur Highway Crash: कुची फाटा येथे १८ चाकी ट्रकने टेम्पोला जोरदार धडक दिल्याने तीन महिलांचा मृत्यू झाला, तर आठ महिला जखमी आहेत. द्राक्षबागेहून परतताना ही भीषण दुर्घटना घडली.

Namdeo Kumbhar

विजय पाटील, सांगली प्रतिनिधी

Miraj Pandharpur road accident : मिरज पंढरपूर कोची फाट्याजवळ ट्रक आणि टेम्पोच्या भीषण अपघातात तीन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर आठ महिला जखमी झाल्या आहेत. द्राक्षबाग तोडणीसाठी मिरजमधून त्या महिला सोलापूरमध्ये गेल्या होत्या. घरी परत येताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. महिलांनी भरेलेल्या टेम्पोला १८ चाकी ट्रकने मागून जोरदार धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाला. अपघातानंतर ११ महिलांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारावेळी तीन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर ८ जणींवर सध्या उपचार सुरू आहेत. ३ महिलांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

मिरज तालुक्यातील म्हैशाळ येथील महिला द्राक्षबाग तोडणीसाठी सोलापूर जिल्ह्यातील खेरडी गावांमध्ये गेले होते. रात्री घराकडे परत येताना काळाने घाला घातला. कवठेमंकाळ पंढरपूर महामार्गावरील कुची फाटा येथे १८ चाकी ट्रकने महिलांनी भरलेल्या टेम्पोला जोराची धडक दिली. महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर इतर आठ महिला आणि चालक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

भारती कांबळे, रेखा कांबळे, राणी वडर, या महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ट्रकने दिलेली धडक इतकी जोरात होती की टेम्पो पलटी झाला अन् काही महिला टेम्पोतून बाहेर फेकल्या गेल्या होत्या. घटनास्थळाहून ट्रक चालकाने पळ काढला आहे. याबाबत कवठेमंकाळ पोलीस ठाण्यात ट्रक चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत महिला मिरज तालुक्यातील म्हैशाळ या गावातील आहेत. या भीषण अपघाताने संपूर्ण गाव हादरून गेले असून शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी जळगावात नाशिकच्या विशेष पथकांची धडक

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरमध्ये खात्यात जमा होणार ₹2,000? जाणून घ्या मोठी अपडेट

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT