Mira Bhayander News Saam tv
महाराष्ट्र

Mira Bhayander News: पैश्याची होळी करत सोडली पाण्यात; मीरा भाईंदर पालिकेविरुद्ध मनसेचे अनोखे आंदोलन

पैश्याची होळी करत सोडली पाण्यात; मीरा भाईंदर पालिकेविरुद्ध मनसेचे अनोखे आंदोलन

चेतन इंगळे

भाईंदर : मीरा भाईंदर शहरात पावसामुळे अनेक सकल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. साचलेल्या (Mira Bhayander) पाण्यामुळे येथील राहिवासी पूर्णतः त्रस्त झाले आहे. या पाण्यात उतरून महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) पैशांची होळी करत अनोखे आंदोलन केले. (Tajya Batmya)

पावसाळा (Rain) सुरू होण्यापुर्वी महापालिकेकडून नालेसफाई केली जात असते. दरवर्षी हे काम पालिका प्रशासन करत असते. त्‍यानुसार यंदा देखील काम झाले असून मीरा भाईंदर पालिका प्रशासनाने ९९ टक्‍के नाले सफाई केल्‍याचा दावा केला होता. मात्र दुसऱ्या तिसऱ्या पावसातच पालिकेने केलेले दवे फोल ठरले आहेत.

याच गोष्टीचा निषेध व्यक्त करण्यासाठी मनसे आक्रमक झाली आहे. पालिकेचा निषेध व्यक्त करण्यासाठी चक्क पैश्याची होळी करण्यात आली आहे. मीरा भाईंदर पालिका प्रशासनाने पाण्याचे नियोजन केले नाही; तर यापेक्षा अधिक मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्याचे आवाहन मनसेने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पावसाळ्यात पिंपल्स आणि ऑयली स्किनचा त्रास? फॉलो करा या 7 सोप्या टिप्स

Healthy fruit: सफरचंद नाही तर 'हे' 1 फळं खाऊन तुम्ही राहाल डॉक्टरांपासून दूर

Gold Price Today : आठवडाभरात सोन्याच्या दरात मोठी उसळी, मुंबईत २४ कॅरेट सोन्याच्या भाव ₹१,४४,९३० तोळा, वाचा ताजे दर

Maharashtra News Live Update: बीड पोलिसांना 112 वर खोटा फोन करणाऱ्या दोघांवर गुन्हा

Shocking : मुंबई हादरली! प्रसिद्ध हॉटेलमध्ये महिलेवर लैंगिक अत्याचार; बिझनेसमनला बेड्या

SCROLL FOR NEXT