Jalna Bank Election: जिल्हा बँक निवडणुकीत १२ अर्ज अवैध; संतोष दानवे, राहुल लोणीकर बिनविरोध

जिल्हा बँक निवडणुकीत १२ अर्ज अवैध; संतोष दानवे, राहुल लोणीकर बिनविरोध
Jalna Bank Election
Jalna Bank ElectionSaam tv
Published On

जालना : जालन्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली. (Bank) बँक निवडणूकीसाठी दाखल ६७ अर्जांची छाननी झाली (Jalna) आहे. यात १२ जणांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत. (Live Marathi News)

Jalna Bank Election
Gadchiroli News: गडचिरोली पुरवठा विभागाकडून दोन हजार शिधापत्रिका रद्द

जालना जिल्ह्याच्या राजकारणात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ताब्यात असणे म्हणजे जमेची बाजू मानली जाते. त्यामुळे सर्व पक्षांच्या नेत्यांना बँकेवर सभासद म्हणून निवडून जाण्यासाठी निवडणुकीच्या (Election) रिंगणात उभे राहतात. या उमेदवारांच्या निवड प्रक्रियेची छाननी झाली असून यात १७ जागांसाठी ६७ अर्ज आले आहेत. यात १२ जणांचे अर्ज अवैध ठरवण्यात आलेत. यामध्ये काँग्रेसचे माजी आमदार सुरेशकुमार जेथलियांसह शिवसेना जिल्हा प्रमुख मोहन अग्रवाल यांचाही समावेश आहे. त्यांना अपिल करण्यासाठी तीन दिवसांची मुदत देण्यात देण्यात आली.

Jalna Bank Election
Shirpur News: शिरपूर शहरात चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री दोन कार लांबविल्‍या

तर मतदारसंघात एकमेव अर्ज आल्याने भाजपचे आमदार संतोष दानवे हे बिनविरोध निवडून जाणार आहेत. परतूर बाजार समितीचे सभापती राहुल लोणीकर हे देखील बिनविरोध झाले आहे. तर मंठ्यात संदिप गोरे यांच्या विरोधातले अर्ज बाद ठरले आहेत. जिल्हा बँकेची निवडणुक बिनविरोध व्हावी; यासाठी सर्व पक्षांच्या नेत्यांच्या बैठका सुरु आहेत. मात्र अद्याप ठोस निर्णय झाला नसल्याने अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ही ११ जुलै असून त्याचदिवशी कोण शड्डू ठोकणार हे स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com