Gadchiroli News: गडचिरोली पुरवठा विभागाकडून दोन हजार शिधापत्रिका रद्द

गडचिरोली पुरवठा विभागाकडून दोन हजार शिधापत्रिका रद्द
Gadchiroli News Ration Card
Gadchiroli News Ration CardSaam tv
Published On

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा पुरवठा विभागाने शिधापत्रिकांची तपासणी (Gadchiroli) सुरू केली आहे. यात तब्बल २ हजार १०७ शिधापत्रिका रद्द ठरवले आहेत. यात बनावट (Ration Card) रेशनकार्ड धारकांची संख्‍या अधिक आहे. (Breaking Marathi News)

Gadchiroli News Ration Card
Tuljabhavani Devi Temple: तुळजाभवानी मंदीरातील दानपेटीत ३३ किलो अशुद्ध सोने

केंद्र शासनाने वन नेशन, वन रेशन कार्ड ही योजना सुरू केली आहे. या अंतर्गत देशात कुठेही वास्तव्याला असले तरी संबंधित रेशन कार्डधारकाला धान्याचा लाभ मिळतो. मात्र काही रेशन कार्डधारक स्थलांतरित झाल्यानंतर डुप्लिकेट रेशन कार्ड बनवतात. अशा रेशन कार्डची गडचिरोली जिल्हा पुरवठा विभागाने छाननी करून रेशन कार्ड रद्द केले.

Gadchiroli News Ration Card
Tiger Attack: वाघाचा अचानक हल्ला; शेळ्या चारायला गेलेल्‍या इसमाला मृत्‍यू

गडचिरोली जिल्ह्यात अंत्‍योदय योजनेचे १ लाख १५७ तर प्राधान्य कुटुंब १ लाख १५ हजार २७ शिधापत्रिका आहेत. या सर्वांना धान्याचा लाभ दिला जातो. मात्र काही नागरिकांनी दोन राज्यात रेशन कार्ड तयार केले होते. ही बाब ऑनलाईन प्रोसेसमुळे उघडकीस आल्याने त्यांचे रेशन कार्ड रद्द करण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com