Tiger Attack: वाघाचा अचानक हल्ला; शेळ्या चारायला गेलेल्‍या इसमाला मृत्‍यू

वाघाचा अचानक हल्ला; शेळ्या चारायला गेलेल्‍या इसमाला मृत्‍यू
Tiger Attack
Tiger AttackSaam tv
Published On

शुभम देशमुख

भंडारा : भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील खातखेडा येथे वाघाने (Tiger Attack) एका इसमावार हल्ला केला. यात सदर इसमाचा (Bhandara) मृत्यू झाला आहे. ही घटना आज सकाळी घडली आहे. (Maharashtra News)

Tiger Attack
Maval News: जंगल सफारी बेतली जीवावर; घराकडे येताना चार विद्यार्थी वाट चुकले

भंडारा जिल्‍ह्यातील खातखेडा येथील ईश्वर मोटघरे (वय ५८) हे आज सकाळी शेळ्या चारण्यासाठी शेतशिवाराच्‍या दिशेने गेले होते. परंतु, गावाशेजारीच दबा धरुन बसलेल्या वाघाने अचानक ईश्‍वर यांच्‍यावर हल्ला केला. यात वाघाने मानेला जबड्यात धरल्‍याने त्‍यांना खोलवर इजा झाली होती. यात त्‍यांचा जागीच मृत्‍यू झाला.

Tiger Attack
Tuljabhavani Devi Temple: तुळजाभवानी मंदीरातील दानपेटीत ३३ किलो अशुद्ध सोने

वाघाने हल्‍ला केल्‍याची माहिती गावात पसरताच गावकऱ्यांनी घटनास्‍थळाकडे धाव घेतली. यानंतर सदर घटनेची माहिती (Forest Department) वन विभागाला देण्यात आली. यानंतर वन विभागाची टीम गावात पोहचत पंचनामा सुरू केला आहे. तर ईश्‍वर मोटघरे यांचा मृतदेह रूग्‍णालयात नेला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com