Shrigonda burnt body investigation 
महाराष्ट्र

अहिल्यानगरमधील धक्कादायक प्रकार; तरुणीचा खून करून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न, प्रियकरासह वडील ताब्यात

minor girl murder case : अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंद्यात अल्पवयीन मुलीचा खून करून मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी प्रियकरासह त्याच्या वडिलांना ताब्यात घेतले असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Namdeo Kumbhar

सुशील थोरात, अहिल्यानगर प्रतिनिधी

श्रीगोंदा शहरातील वडाळी रस्त्यालगतच्या जंगल परिसरात जळालेल्या अवस्थेत आढळलेल्या अल्पवयीन मुलीच्या मृतदेहाची ओळख पटविण्यात श्रीगोंदा पोलिसांना यश आले आहे. या मुलीचा खून करून मृतदेह जाळत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पिता-पुत्राला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे श्रीगोंदा तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

आरोपी शुभम सुखदेव ओव्हाळ याचे मृत अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध होते. १५ जून रोजी दुपारी चारित्र्याच्या संशयावरून त्यांच्यात वाद झाला. या वादातून संतापाच्या भरात शुभम ओव्हाळ याने लोखंडी रॉड आणि फरशीने मुलीवर हल्ला करून तिच्या डोक्यात गंभीर दुखापत केली. या जीवघेण्या मारहाणीत मुलीचा मृत्यू झाला.

खून केल्यानंतर आरोपीने मृतदेह घरातच लपवून ठेवला आणि केडगाव येथे राहणाऱ्या आपल्या आई-वडिलांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर आरोपी आणि त्याचे वडील सुखदेव ओव्हाळ हे श्रीगोंद्यात आले. त्यांनी मृतदेह गादीमध्ये गुंडाळून दोरीने बांधला आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने वडाळी रोडवरील जंगल परिसरात नेला. तिथे लाकडे गोळा करून आणि मृतदेहावर पेट्रोल टाकून तो जाळल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

या घटनेची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ तपास सुरू केला. पहाटे वडाळी रोड परिसरातील जंगलात पोलिसांना जळालेला मृतदेह आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपी शुभम ओव्हाळ आणि त्याचे वडील सुखदेव ओव्हाळ या दोघांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT