Akola Crime  Saam tv
महाराष्ट्र

Akola Crime : अकोला हादरलं! चाकूचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, सकल हिंदू आक्रमक

Akola Crime news : अकोल्यातील डाबकी रोडवर अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर सकल हिंदू समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे.

Saam Tv

अकोल्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

जुन्या शहरातील डाबकी रोडवर घडली अत्याचाराची घटना

घटनेनंतर हिंदू समाज आक्रमक

पीडित मुलीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु

अक्षय गवळी, साम टीव्ही

akola crime : अकोल्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. अकोल्यातील जुन्या शहरातील डाबकी रोड परिसरात ही घटना घडली. या घटनेने अकोला परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर सकल हिंदू समाज आक्रमक झाला आहे. पीडित मुलीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत

मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीवर चाकूचा धाक दाखवत अत्याचार झाला. जुन्या शहरातील डाबकी रोड परिसरातील घटनेने खळबळ उडाली.आरोपीने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवत अत्याचार केला. मात्र घटनेपासून आरोपी फरार असल्याची माहिती मिळत आहे.

आरोपीच्या शोधार्थ पोलिसांचे तीन पथक रवाना झाले असल्याचे माहिती अकोला पोलिसांनी दिली. तर पीडित मुलीवर अकोल्याचे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरींनी रुग्णालयात भेट घेतली.

अत्याचाराच्या घटनेनंतर बजरंग दलचे कार्यकर्ते आणि सकल हिंदू समाज आक्रमक झाला आहे. आरोपीवर कठोर करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. तर आरोपीला पकडण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी 1 लाखाचं बक्षीस जाहीर केलं आहे.

बीडमध्ये शिक्षिकेवर अत्याचार

बीडमध्ये काही दिवसांपूर्वी एका शिक्षिकेवर अत्याचार झाल्याची घटना घडली. आरोपी हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी असून जिल्हा परिषदेचा माजी सदस्य देखील आहे. या प्रकरणात आरोपीने आमदार धनंजय मुंडे आणि संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड यांची मदत घेतल्याचा महिलेचा दावा आहे. त्यांच्या उपस्थितीत बैठक झाल्याचे महिलेने तक्रारीत नमूद केलंय. पीडित महिलेने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Cricket News : माजी क्रिकेटपटू शोएब मलिकचा तिसरा घटस्फोट होणार? व्हायरल व्हिडिओमुळे चर्चांना उधाण

‘नायक नहीं खलनायक है तू'; काँग्रेसचे नेते संजू बाबावर लय संतापले, काय आहे कारण?

Ganesh Naik Vs Eknath Shinde: ठाण्यात शिंदेसेना विरुद्ध भाजप, नाईक विरुद्ध शिंदे वाद लायकीवर?

Balasaheb Thackeray Death Controversy: बाळासाहेबांचा मृतदेह दोन दिवस का ठेवला? रामदास कदमांच्या विधानामुळे राजकीय खळबळ

Laxman Hake: मराठा नेते मनोज जरांगेंच्या मागण्यांवर लक्ष्मण हाके काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT