Beed Crime News Saam Tv
महाराष्ट्र

महाराष्ट्र हादरला! १५ वर्षाच्या मुलीवर ३ जणांचा सामूहिक बलात्कार, बारावीच्या पोरानं घरी बोलवलं अन्...

Nagpur POCSO Case Update : नागपूरमध्ये १५ वर्षीय मुलीवरील अत्याचार प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Namdeo Kumbhar

Nagpur minor assault case latest update : महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. आरोपीने १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला घरी बोलवले. त्यानंतर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केला. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घटना घडली आहे. मुख्य आरोपी हा पीडितेच्या मैत्रिणीचा भाऊ असून तो १२ वीचा विद्यार्थी आहे. ५ फेब्रुवारी रोजी आरोपीने तिला काही कारणास्तव मेसेज केला होता. त्यामुळे ती त्याला भेटायला त्याच्या घरी गेली. तिथे इतर कोणीतरी असेल असा तिचा समज होता, मात्र तिथे मुख्य आरोपीसह त्याचे इतर दोन मित्र आधीच उपस्थित होते. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली असून ३ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. तीन आरोपींपेकी दोन अल्पवयीन आहेत. सर्वांवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

अल्पवयीन मुलाने बहिणीच्या मैत्रिणीची छेड काढली होती. त्यानंतर फोनवर मेसेज पाठवत मुलीला घरी बोलवले. मात्र त्यावेळी घरी फक्त हा अल्पवयीन मुलगा आणि त्याचे दोन मित्र होते. त्यांनी तिला आतल्या खोलीत नेऊन बलात्कार केला. अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी हा बारावीचा विद्यार्थी आहे. अत्याचार करताना आरोपींनी व्हिडिओ शूट केला. कुणाला काही सांगितले तर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.

या प्रकारामुळे पीडित मुलगी प्रचंड घाबरली होती. मात्र, अखेर चार दिवसांनंतर तिने हिंमत एकवटली आणि घडलेला सर्व प्रकार आपल्या कुटुंबाला सांगितला. पालकांनी तातडीने पोलिसांत तक्रार दाखल केली, त्यानंतर पोलिसांनी तात्काळ दखल घेत आरोपींना बेड्या ठोकल्या. आरोपी मुलाचा मंगळवारी पहिला पेपर होता, पण क्रूर कृत्यामुळे परीक्षा केंद्रात जाण्याऐवजी त्याची रवानगी पोलिसात झाली. आरोपींनी मुलीवर बलात्कार करतानाचा व्हिडिओ खरोखर शूट केला का? याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. आरोपींचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

आरोपीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका

या घटनेचे पडसाद आरोपींच्या कुटुंबावरही उमटले आहेत. मुख्य आरोपीची १२ वीची परीक्षा सुरू असून या गुन्ह्यामुळे त्याला आपला पहिला पेपर देता आला नाही. आपला मुलगा अशा गंभीर गुन्ह्यात अडकल्याची बातमी कळताच त्याच्या वडिलांना मोठा धक्का बसला आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Candy: जेवणानंतर खा आंबट-गोड आवळा कँडी; पचन सुधारेल आणि वाढेल रोगप्रतिकारक शक्ती

Rakhi Sawant : "पहिल्यांदा राखी सावंतने जे केले ते सगळ्यांना आवडले..."; VIDEO होतोय तुफान व्हायरल

HSC Exam: शिक्षकांनीच विद्यार्थ्यांना पुरवली कॉपी; बोर्डाच्या CCTV कॅमेऱ्यात सगळं काही रेकॉर्ड, सामूहिक कॉपी प्रकरणी मोठी कारवाई

Maharashtra Politics: माझी हत्या करण्याचा प्रयत्न, धैर्यशील मोहिते पाटील मास्टरमाईंड; भाजप नेत्याचा खळबळजनक दावा

Valentine Special Dessert : व्हॅलेंनटाइन डेसाठी घरीच बनवा चोको लावा केक, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT