shambhuraj desai, satara.  saam tv
महाराष्ट्र

Shambhuraj Desai on jalna Protest: जालन्यात गोळीबार झालाच नाही; मंत्री शंभूराज देसाई यांचा दावा

Shambhuraj Desai: विरोधकांचे आरोप मंत्री शंभूराज देसाई यांनी खोडून काढले आहेत. जालन्यात गोळीबार झालाच नाही, असा दावा मंत्री देसाई यांनी केला आहे.

सूरज सावंत

Shambhuraj Desai News

जालन्यातील मराठा आंदोलकांवर लाठीमार झाल्याने राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. जालन्याच्या घटनेवरून राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शरद पवारांनी आरोप केला की, पोलिसांनी लाठीमार केला, तसेच हवेत गोळीबार केला'. मात्र, विरोधकांचे हे आरोप मंत्री शंभूराज देसाई यांनी खोडून काढले आहेत. जालन्यात गोळीबार झालाच नाही, असा दावा मंत्री देसाई यांनी केला आहे. (Latest Marathi News)

मंत्री शंभूराज देसाई यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी जालन्यातील घटनेवर भाष्य केलं. मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, ' काल जालना मध्ये जे काही झालं, पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. या घटनेचे शासन म्हणून कधीच समर्थन करणार नाही. या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीत कोणी दोषी आढळले तर कारवाई केली जाईल ही भूमिका स्पष्ट केली आहे'.

'आता महायुतीचं सरकार आलं आहे. आता पुन्हा याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही बैठक घेत आहोत. पुनर्विचार याचिकेची प्रक्रिया सुरू आहे. सारथीची केंद्र सुरु केली. सुप्रीम कोर्टाचा निकाल लागेपर्यंत कशा सवलती देता येतील, याचा विचार सुरु आहे, असे ते म्हणाले.

' काल सर्वांनी राज्यातील जनतेला आवाहन केलं आहे की, ओबीसींच्या आरक्षाला धक्का न लागता मराठा आरक्षण मिळावे या भूमिकेत सरकार आहे. आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती मिळाली. आरक्षणासाठी कोर्टाच्या प्रकियेतून जावंच लागेल,असे ते म्हणाले.

'मराठा समाजात द्रारिद्र रेषेखाली किती आहेत, ही सर्व माहिती सुप्रीम कोर्टाच्या समोर यायला हवी. पण आता कोणत्याही नेत्याने राजकारण करु नये. राज्य सरकार आरक्षणाबाबत सकारात्मक आहे. कायदेशीर सर्व तयारी सरकारने केली आहे. कोणीही भडकाऊ बाबींकडे लक्ष देऊ नये. सरकार मराठा समाजाच्या मागे नाही हे असत्य आहे, असे शंभूराज देसााई पुढे म्हणाले.

'राज्य सरकार आरक्षण कसं कायम राहील हे करण्यासाठी कटीबद्ध आहे. जालन्यात गोळीबार झालाच नाही. शरद पवार साहेबांनी हे पण पाहिलं पाहिजे की, देवेंद्र फडणवीस काल बोलले की लाठीमार झाला नसता तर पोलिसांची काय अवस्था झाली असती..., असे ते पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jeffrey Epstein Photo : ६८ फोटो अन् चॅट्स रिलीज, बिल गेट्स महिलांसोबत दिसले, एपस्टीन फाईल आज सार्वजनिक होणार

Today Winter Temprature : राज्यात तापमानात चढ-उतार! 'या' जिल्ह्यांत पारा १० अंशाच्या खाली; वाचा आजचे हवामान कसे असेल?

Maharashtra Live News Update: भाजप-शिवसेना पुणे महापालिका एकत्र लढणार- मुरलीधर मोहोळ

Bank Holidays: कामाची बातमी! देशभरात बँकांना सलग ५ दिवस सुट्टी; कारण काय?

Mangal-Budh Yuti: मंगळ-बुध ग्रहाची होणार महायुती; 'या' राशींची तिजोरी तुडुंब भरणार

SCROLL FOR NEXT