Minister Sanjay Shirsat inspecting the under-construction 13-storey girls’ hostel in Nagpur. Saam Tv
महाराष्ट्र

एकीकडे अधिवेशन सुरू आणि दुसरीकडे मंत्री संजय शिरसाटांनी टाकली नागपुरमधील हॉस्टेलवर धाड, नेमकं काय घडलं?

Sudden Inspection By Social Justice Minister Sanjay Shirsat: नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू असताना सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी संत चोखामेळा मुलींच्या वसतिगृहावर अचानक धाड टाकून कामकाजाची सविस्तर पाहणी केली.

Omkar Sonawane

सरकारचे हिवाळी अधिवेशनला नागपूरमध्ये सुरुवात झाली आहे. या अधिवेशनासाठी सर्व आमदार आणि मंत्री नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट हे देखील नागपूरमध्ये दाखल झालेय. एकीकडे अधिवेशन सुरू असताना शिरसाटानी नागपूरमधील एका हॉस्टेलवर धाड टाकली.

यावेळी त्यांच्यासोबत काही अधिकारी देखील होते. हॉस्टेलमध्ये कोणत्या सुविधा मिळणार आहेत याची त्यांनी माहिती घेतली. तसेच अधिकाऱ्यांशी देखील चर्चा केली. नागपूरमध्ये अनाथ मुलांच्या हॉस्टेलचे काम सुरू आहे, ते वेळेवर सुरू झालेले नाही. या ठिकाणी 1500 मुलांच्या राहण्याची सोय करण्यात येणार आहे. याच ठिकाणी संजय शिरसाट यांनी अचानक धाड टाकत पाहणी केली.

यानंतर संजय शिरसाट म्हणाले, आज नागपूर येथे संत चोखामेळा मुलींचे वसतिगृह येथे भेट देऊन संपूर्ण कामकाजाची सविस्तर पाहणी केली. विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी, राहण्याच्या सोयीसाठी आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करण्यासाठी सुरू असलेल्या सर्व कामांचा प्रत्यक्ष आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या विशेष सूचना दिल्या.

तेरा मजली या वसतिगृहामध्ये नागपूरसह राज्यातील आणि विविध शहरांमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रशस्त, सुरक्षित आणि उच्च प्रतीच्या सुविधांची उभारणी करण्यात येत आहे. सेमिनार हॉल, अध्ययनासाठी योग्य वातावरण, स्वच्छ व व्यवस्थित राहण्याची सोय, आधुनिक सुविधा आणि मुला–मुलींसाठी आवश्यक असलेली प्रत्येक मूलभूत सुविधा उत्तम दर्जात उपलब्ध करण्याचे निर्देश देण्यात आले.

प्रगतीपथावरील सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करून विद्यार्थ्यांना उत्कृष्ट, दर्जेदार आणि सुसज्ज वसतिगृह उपलब्ध व्हावे, अशा स्पष्ट सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

आगामी काळात येथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षण, विकास आणि गुणवत्तापूर्ण वातावरणासाठी हे वसतिगृह एक उत्तम केंद्र ठरेल, अशी अपेक्षा संजय शिरसाट यांनी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Metro 8: मुंबई, मानखुर्द ते पनवेल, 11 स्थानकं कोणती? कसा असेल मुंबई-नवी मुंबई जोडणारा मेट्रो ८ चा प्रोजेक्ट?

Maharashtra Tourism : धुक्याची चादर अन् दाट जंगल; विदर्भातील सर्वात सुंदर हिल स्टेशन, हिवाळ्यात नक्की जा

पुण्यात अपघाताचा थरार; नवले पुलाजवळ दिवसभरात दुसरा भीषण अपघात

Maharashtra Politics: महायुतीत फोडाफोडी बंद, पण 'ठणाठणी' सुरूच; कल्याण-डोंबिवलीतलं राजकारण पुन्हा तापलं

Maharashtra Live News Update: पुण्यातील नवले पुलाजवळ पुन्हा अपघात

SCROLL FOR NEXT