राज्यमंत्री बच्चू कडू Saam Tv
महाराष्ट्र

राज्यमंत्री बच्चू कडूंना न्यायालयाने सुनावली 2 महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा! (पहा Video)

शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या संदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. अमरावती कोर्टाने त्यांच्या बाबतीत एक मोठा निर्णय घेतला आहे.

अरुण जोशी

अरुण जोशी

अमरावती: राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्या मालकीचा मुंबई येथील फ्लॅट ची माहिती लपवल्याप्रकरणी चांदूर बाजार प्रथमवर्ग न्यायालयाने त्यांना पंचवीस हजार रुपयांचा दंड ठोठावून दोन महिन्याची शिक्षा ठोठावली आहे. जनतेची दिशाभूल करणारा बच्चू कडू यांनी आता मंत्रिपदाचा आमदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी चांदूर बाजार येथील भाजपचे माझी नगरसेवक गोपाल तिवारी यांनी केली आहे. (Bacchu kadu Latest News In Marathi)

असे हे प्रकरण;

विधानसभेसाठी 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीदरम्यान (Assembly Elections) चांदूरबाजार मतदारसंघातून बच्चू कडू यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. उमेदवारी अर्ज भरताना बच्चू कडू यांनी संपत्तीचे विवरण सादर केले होते. त्यामध्ये मुंबई (Mumbai) येथे त्यांच्या मालकीचा असणाऱ्या प्लेट ची माहिती लपवली होती. याबाबत भाजपचे तत्कालीन नगरसेवक गोपाल कुमार यांनी 27 डिसेंबर 2017 रोजी आसेगाव पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली होती. त्यावेळी पोलिसांनी बच्चू कडू यांच्या विरोधात लोकप्रतिनिधी प्रतिबंधक कायदा कलम 125 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक अजय आखरे यांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला होता.

राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा;

या संपूर्ण प्रकरणाचा तपास केल्यावर पोलिसांनी बच्चू कडू यांच्या विरोधात दोषारोपपत्र चांदूरबाजार न्यायालयात सादर केले होते. न्यायालयाने या प्रकरणात संपूर्ण साक्षीपुरावे तपासून आज बच्चू कडू यांना 25 हजार रुपयांचा दंड ठोठावत दोन महिने सक्षम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

जनतेची केलेली फसवणूक;

बच्चू कडू यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्याकडे असणाऱ्या संपत्तीची माहिती लपविली. चुकीच्या पद्धतीने निवडणूक जिंकणारा बच्चू कडू यांनी जनतेची फसवणूक केली असून त्यांना आता मंत्री पदावर राहण्याचा अधिकार नाही यामुळे त्यांनी मंत्रिपदाचा आमदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. याविरोधात अमरावतीतील (Amravati) अचलपूरचे भाजपाचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी तक्रार दाखल केली होती. या खटल्यात चांदूरबाजार प्रथमवर्ग न्यायालयाने आज निकाल दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुसळधार पावसामुळे मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर

Janhvi Kapoor: हंडी फोडताना 'भारत माता की जय' म्हणल्यामुळे जान्हवी कपूर ट्रोल; अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करत सुनावले खडेबोल

Beed Heavy Rain : बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस; अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती, पुरात जीप वाहून गेल्याने ६ जण अडकले

High Blood Pressure : हाय ब्लड प्रेशर तर होणारच नाही शिवाय किडनीही निरोगी राहील, फक्त तुमच्या आहारात या गोष्टींचा समावेश करा

FASTag Annual Pass: मुंबई पुणे एक्सप्रेस वे, समृद्धी महामार्ग आणि अटल सेतूवर फास्टॅग पास नाहीच!

SCROLL FOR NEXT