Minister Hasan Mushrif, Samarjit Ghatge  Saam Tv
महाराष्ट्र

हे प्रकरण महागात पडणार; हसन मुश्रीफांचा घाटगेंना इशारा

कोल्हापुरातील राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसाच्या पोस्टरवरुन नवा वाद सुरु झाला आहे.

संभाजी थोरात

कोल्हापूर : कोल्हापुरातील (Kolhapur) राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसाच्या पोस्टरवरुन नवा वाद सुरु झाला आहे. मुश्रीफ यांच्या नावामध्ये प्रभू रामाचं नाव चित्रित केल्यामुळे वाद सुरु झाला आहे. यावर भाजपचे नेते समरजीत घाटगे यांनी आक्षप घेत तक्रार दाखल करणार असल्याचे म्हटले आहे. यावर मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी समरजीत घाटगे यांच्या आरोपाला उत्तर दिले आहे. हे सगळं प्रकरण समरजीत घाटगे यांना महागात पडणार, असा इशाराही मुश्रीफ यांनी दिला.

मी माझ्या कार्यकर्त्यांना समय राखण्याचे आवाहन केलं आहे. गेल्या ५० वर्षांपासून मी राम नवमीला वाढदिवस साजरा करत आहे. मग आताच यांच्या पोटात का दुख:त आहे, असा सवालही मुश्रीफ यांनी केला आहे. मुश्रीफ म्हणजे वडाचे भक्कम झाड असून, कुंडीतल्या झाडाला पाणी घातल्याशिवाय वाढत नाही, असा टोला हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी समरजीत घाटगे यांना लगावला. त्याचबरोबर सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेल्या व्यक्तीला राजकारण काय कळणार असं देखील मुश्रीफ म्हणाले.

काल ३ वर्षे गायब असलेले झाड अचानक समोर आलं. त्यांना कुणीतरी उकसवले आहे आणि आपण आता आलोय हे दाखवावं म्हणून ते आलेत. हे धाडस त्यांना महाग पडेल, अशी टीका समरजीत घाटगे यांच्यावर केली आहे.

माझी आई मला म्हणायची राम नवमी दिवशी जन्मलो आहे. गोकुळ दूध संघाने ती जाहिरात दिली आहे. त्यात माझा काय संबंध, त्यात चुकीचं काय? असा सवाल देखील मुश्रीफ यांनी यावेळी उपस्थित केला.

हे देखील पहा

नेमकं प्रकरण काय आहे?

हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसाला लावलेल्या पोस्टरवरुन नवा वाद निर्माण झाला आहे. राम नवमीदिवशी हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. मात्र, वाढदिवसाच्या शुभेच्छांच्या निमित्ताने कोल्हापूर दूध उत्पादक संघाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या पोस्टरवर हसन मुश्रीफ यांचे नाव श्रीरामांसोबत जोडण्यात आले होते. यावरुन आता कोल्हापुरात राजकारण तापणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

SCROLL FOR NEXT