gulabrao patil Saam tv
महाराष्ट्र

हवाई उड्डाण अचानक रद्द; मंत्री गुलाबराव पाटील कारने निघाले, नेमकं काय घडलं?

gulabrao patil news : गुलाबराव पाटील यांचं हवाई उड्डाण अचानक रद्द करण्यात आलं. त्यामुळे मंत्री गुलाबराव पाटील कारने निघाले.

Vishal Gangurde

मंत्री गुलाबराव पाटील यांचं हवाई उड्डाण अचानक रद्द झालं

मंत्री गुलाबराव पाटील लातूरहून छत्रपती संभाजीनगरला निघाले होते

विमानाला क्लिअरनेस न मिळाल्याने उड्डाण रद्द

संदिप भोसले, साम टीव्ही

राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. नेतेमंडळी विविध भागात प्रचाराला जात आहेत. काही मंत्री विमानाने सभास्थळी जात आहेत. याचदरम्यान काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला होता. त्यानंतर आता मंत्री गुलाबराव पाटलांचं हवाई उड्डाण अचानक रद्द करण्यात आलं. त्यानंतर रस्तेमार्गे कारने पुढच्या दिशेला निघाले.

मंत्री गुलाबाव पाटील हे लातूर दौऱ्यावर आहेत. ते लातूरवरून विमानाने छत्रपती संभाजीनगरला जाणार होते. या प्रवासाठी मंत्री गुलाबराव पाटील यांनी संपूर्ण तयारी केली. परंतु त्यांच्या विमानाला लातूरमध्ये क्लिअरनेस मिळाला नाही. त्यामुळे त्यांना अचानक कारने छत्रपती संभाजीनगरला जावे लागले. खरंतर त्यांच्या विमानाने दोन वेळेस उड्डाण घेतले होते. परंतु क्लिअरनेस मिळत नसल्याने उड्डाण रद्द करण्यात आलं.

Avocet एव्हिएशन कंपनीचे सहा आसन क्षमतेचं हे विमान होतं. हैदराबाद ,बिदर आणि चेन्नई या ठिकाणावरून क्लिअरन्स आला नसल्यामुळे लातूर विमानतळावरून उड्डाण रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. मंत्री गुलाबराव पाटील हे लातूर विमानतळावरून साडेचारच्या दरम्यान उड्डाण करणार होते.

तत्पूर्वी, पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये काल तांत्रिक बिघाड झाला. त्या छत्रपती संभाजीनगरवरून लातूरच्या दिशेने निघाल्या होत्या. लातूर दौऱ्यावर जात असताना ही घटना घडली. वेळीच बिघाड लक्षात आल्याने अनर्थ टळला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BREAKING: गदारोळानंतर केंद्र सरकारची मोठी कारवाई! शिक्षण विभागातील IAS अधिकाऱ्याची हकालपट्टी, नवीन अधिकाऱ्याचीही नियुक्ती

Maharashtra News Live Update: कॉकरोच जनता पार्टीचा आज पुण्यात मोर्चा

Masala Dosa Recipe: नाश्त्यासाठी घरीच बनवा हॉटेलस्टाईल कुरकुरीत मसाला डोसा, वाचा सोपी रेसिपी

Salt comparison: काळं मीठ आणि सैंधव मीठ यांच्यात काय फरक आहे?

Rain Alert : राज्यात मुसळधार पाऊस, पुण्यासह २० जिल्ह्यांना अलर्ट जारी; वाचा तुमच्या जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT