gulab patil  Saam tv
महाराष्ट्र

Gulabrao Patil : 16 किमी सायकलवर जाऊन केली नोकरी, कामाची लाज नाही; महायुतीतील मंत्र्यांनी सांगितले संघर्षाचे दिवस

Gulabrao Patil Latest News : महायुतीमधील मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या संघर्षाचे दिवस सांगितले. त्यावेळी कामासाठी 16 किमी सायकलवर जाऊन नोकरी केल्याचे सांगितले.

संजय महाजन, साम टीव्ही, जळगाव

जळगाव : मंत्री असो वा सर्वसामान्य माणूस... प्रत्येकाच्या वाटेला संघर्ष असतोच. अनेक जण संघर्षावर मात करून सोनेरी दिवस जगतात. अनेक जण नोकरी करत त्यांच्या आयुष्यातील ध्येय गाठण्यास यशस्वी होतात. अशाच प्रकारे महायुतीमधील मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या आयुष्यातील खडतर प्रवास सांगितला. यावेळी त्यांनी 16 किमी सायकलवर जाऊन नोकरी केल्याचाही उल्लेख केला.

भुसावळमध्ये रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात गुलाबराव पाटील यांनी भाष्य केलं.

गुलाबराव पाटील यांच्या भाषणातील मुद्दे

तुम्ही असं समजा की, आपल्याला प्रवास करायचा आहे. मालेगावला जायचं आहे. मग जी गाडी मिळेल, त्या गाडीत बसायचं. एखादी गाडी स्लो मिळेल, फास्ट मिळेल बसून घ्यायचं. जो गाडी मिली, उसमे बैठ जाने का.. बाद मे देखने का, क्या होता है.

आम्हीही त्यातले आहेत. अनेक लोक पाहिले राजकारणात पहिलीतून दुसरी, दुसरीतून पाचवीत गेले. जे मिळालं, त्याच्यात समाधानी असायला पाहिजे.

सध्या मानसिकता लोकांची अशी झाली आहे की, नोकरी आहे तर छोकरी आहे.

मीही 16 किलोमीटर सायकलवर जाऊन नोकरी केली. कामाची कुठलीही लाज बाळगली नाही. चोरी लबाडीची लाज असते. प्रामाणिक काम केल्याने फळ मिळते. लोकांना नोकरी मिळूनही समाधान नसतं, त्यातही भांडत असतात.

एकनाथ शिंदे यांना मिळालेल्या धमकीवर गुलाबराव पाटील काय म्हणाले?

मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना मिळालेल्या धमकीवर भाष्य केलं. मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, 'धमकी देण्याऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे. एकनाथ शिंदे जनसामान्यांचे नेते आहेत. त्यांना कोणी धमक्या देत असेल, तर ती सहन करण्याची आमची ताकद नाही. वेळ आली तर शिवसेना रस्त्यावर उतरेल. धमकी देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. त्यांनी कोणत्या हेतूने आणि कोणत्या कारणास्तव ही धमकी दिली, याचा संपूर्ण तपास पोलिसांनी करावा, अशी आमची मागणी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Abhijeet Dipke: अभिजीत दीपकेला धोका, ते काहीही करू शकतात; आईने पोलिसांवर केले गंभीर आरोप

Rajgad Tragedy : राजगडावर मोठी दुर्घटना! ट्रेंकिंग करताना तरुण अचानक कोसळला अन्...

Maharashtra News Live Update: अभिजित दिपकेंसह सीपेजीचे ३ नेते कपिल सिब्बल यांच्या निवासस्थानी

Cucumber : काकडी खाताना तुम्ही नकळत करताय 'ही' चूक, वेळीच ओळखा अन् गंभीर समस्यांपासून वाचा

Pune : पिंपरी-चिंचवडमध्ये धक्कादायक घटना! धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण खाली पडला

SCROLL FOR NEXT