Dhananjay Munde News Update 
महाराष्ट्र

Dhananjay Munde : मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढल्या, परळी न्यायालयात आज सुनावणी, नेमकं प्रकरण काय?

Dhanjay Munde Parli News : फडणवीस सराकरमधील मंत्री धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत सापडले आहेत. शपथपत्रातील माहिती प्रकरणी आज परळी न्यायालयात सुनावणी होणार आहे.

Namdeo Kumbhar

Dhananjay Munde News Update : गेल्या काही दिवसांपासून मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी कमी व्हायचे नाव घेत नाहीत. त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप झाले आहे. वाल्मिक कराड यांच्यापासून ते करूणा शर्मा यांच्यामुळे धनंजय मुंडे अडचणीत सापडले आहेत. आता धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. निवडणूक शपथपत्रातील माहिती लपवल्या प्रकरणाची सुनावणी आज परळी कोर्टात होणार आहे. कोर्टा काय निर्णय देणार? याकडे परळीकरांचे आणि राज्याच लक्ष लागले आहे.

विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना खरी माहिती दडवल्याबाबत करुणा शर्मा यांनी दाखल केलेल्या ऑनलाइन तक्रारीच्या अनुषंगाने परळीच्या फौजदारी न्यायालयाने मंत्री धनंजय मुंडे यांना न्यायालयाची कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे. याबाबत आज परळीच्या फौजदारी न्यायालयात सुनावणी होणार आहे . विशेष आज धनंजय मुंडे न्यायालयात हजर राहिले नाहीत, तर अटक वॉरंट निघून शकते असा तक्रारदाराचे वकील चंद्रकांत ठोंबरे यांनी सांगितलं आहे.

धनंजय मुंडे यांनी २०२४ मध्ये परळी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी दाखल उमेदवारी अर्जासोबतच्या शपथपत्रात पत्नी राजश्री मुंडे आणि ३ मुली तसेच करुणा शर्मा यांच्या २ मुलांचा उल्लेख केला होता. मात्र, करुणा शर्मा यांच्या नावावरील मिळकतीबाबत कुठलाही उल्लेख केला नव्हता. त्यांनी वरील खरी माहिती दडविल्याबाबत करुणा शर्मा यांनी बीड येथून परळीच्या फौजदारी न्यायालयात 'ऑनलाइन' तक्रार दाखल केली होती. तक्रारीची मूळ कागदपत्रे ५ फेब्रुवारी २०२५ रोजी न्यायालयासमोर दाखल केली. त्यावरून न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस बजावनाचा आदेश दिला होता. आज त्यावर सुनावणी होणार असून न्यायालयात काय निर्णय देते या कडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT