अकोला - माझ्यावर रस्त्याच्या कामात अफरातफर केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते धैर्यवधन पुंडकर यांनी केले आहेत. हे आरोप चुकीचे आहेत. मी जर या कामांमध्ये एक पैसाही खाल्ला असेल तर धैर्यवर्धन पुंडकर यांच्या घरासमोर हात कलम करेल, असे व्यक्तव्य पालकमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी आज केले. नाहीतर पुंडकर जर मर्दाची औलाद असेल तर पुढे काय करणार त्याने सांगावे, असे म्हणत पालकमंत्री बच्चू कडू यांनी पुंडकर यांना खुले आव्हान दिले.
हे देखील पहा :
कुटासा पिंपळोद हा पूल पाहण्यासाठी बच्चू कडू कुटासा गावात आले होते. याच पुलाबाबत वंचितचे पुंडकर यांनी आक्षेप घेतला होता. यावेळी पालकमंत्री कडू यांनी कार्यकारी अभियंता यांच्यासोबत कामाची माहिती घेऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी ग्रामस्थांनी हा रस्ता किती महत्वाचा आहे हे सांगितले.
या रस्त्याला ग्रामीण रस्ता क्रमांक 120 हा नंबर देण्यात आला आहे. हा नंबर जिल्हा परिषदेने दिला आहे. पुंडकर यांना वेगळ्या चष्माची गरज आहे. आणि त्यांच्यासाठी आम्ही ऑन दि स्पॉट येथे आलो आहे. हा रस्ता चार पाच गावाला जोडणारा रस्ता आहे. याबद्दल पुंडकर यांना माहिती नसावी, कारण ते कधीच या गावात फिरकले नाहीत. ते केवळ वंचितच्याच आजूबाजूने फिरत असतात असा टोला कडू यांनी लगावला.
चार हजार एकर जमीन या रस्त्याला लागून आहे. त्यामुळेच परिसरातील नागरिकांसाठी हा रास्ता अत्यंत महत्वाचा असून या रस्त्याअभावी आजपर्यंत जनावरांचे आणि माणसांचेही अपघात झाले आहे. ट्रॅक्टर, ट्रक या खराब रस्त्यावर खराब होत आहे. त्यामुळेच सातत्याने या रस्त्याची मागणी होत होती, म्हणून हा रस्ता मंजूर केला असल्याचेही कडू यांनी सांगितले.
पुढे बोलताना बच्चू कडू म्हणाले, या रस्त्यामध्ये आमच्या एका पैशाचाही सबंध येत नाही. या रस्त्याची मोठ्या प्रमाणात मागणी ग्रामस्थांकडून होत होती. म्हणून हा रस्ता आपण मंजूर केला. पुंडकर यांनी 3 सप्टेंबर 2016 चा शासन निर्णय वाचवा, त्यात मिसिंग जोडणे, नवीन रस्त्याचे 20 टक्के काम करण्याची कामे त्यामध्ये घेता येतात. याच्यामध्ये कुठलीही अनियमीतता, भ्रष्टाचार झाला नाही. चिंधीचा साप करण्याचा हा प्रकार असून ही बाब अतिशय दुर्दैवी आहे, असेही पालकमंत्री बच्चू कडू म्हणाले.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.