Haji Shahnawaz Khan and Raj Thackeray, Hanuman chalisa row news in Marathi, Raj Thackeray latest Marathi News
Haji Shahnawaz Khan and Raj Thackeray, Hanuman chalisa row news in Marathi, Raj Thackeray latest Marathi News saam tv
महाराष्ट्र

हिम्मत असेल तर मशिदीजवळ येऊन हनुमान चालिसा म्हणा! MIM नेत्याचे मनसेला चॅलेंज

साम न्यूज नेटवर्क

- सिद्धेश म्हात्रे

नवी मुंबई : राज्यातील बहुतांश जिल्ह्यात भोंग्यावर (loudspeaker) नमाज पठन झाले नसताना देखील मनसे कार्यकर्ते आंदोलन करत असल्याने एमआयएमने आक्रमक पवित्रा घेतला आहे. हिम्मत असल्यास मनसे (mns) कार्यकर्त्यांनी मशिदीजवळ येऊन हनुमान चालिसा पठन करावे असा इशारा एमआयएम नेते हाजी शाहनवाज खान (Haji Shahnawaz Khan) यांनी दिला आहे. (Hanuman chalisa row news in Marathi)

हाजी शाहनवाज खान म्हणाले मनसे कार्यकर्ते स्टंटबाजी करीत आहेत. आज अनेक ठिकाणी भाेंगे न लावता नमाज पठन झाले आहे. तरी देखील मनसे कार्यकर्ते आंदोलन करीत आहेत. आता आम्ही गप्प बसणार नाही.

त्यांच्यात (मनसे कार्यकर्ते) हिम्मत असल्यास त्यांनी मशिदीजवळ येऊन हनुमान चालिसा पठन करावे. मनसेने स्टंटबाजी केली तर एमआयएम कार्यकर्ते देखील शांत बसणार नाहीत हे लक्षात ठेवावे असा इशारा हाजी शाहनवाज खान यांनी दिला.

दरम्यान पाेलीसांनी नवी मुंबईत मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरूच ठेवली आहे. वाशी येथील मनसे कार्यकर्त्यांना वाशी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घरातून व कार्यालयातून मनसे पदाधिकाऱ्यांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून खबरदारी घेतली जात आहे असे पाेलीसांनी स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Children Lunch Box : लहान मुलांना दुपारच्या जेवणात द्या 'हे' स्वादिष्ट पदार्थ; १० मिनीटांत ताट करतील रिकामं

Mumbai News : कर्जाचे हफ्ते थकलेल्या वाहनाची परस्पर केली विक्री; व्यावसायिकाच्या फसवणूक प्रकरणी मुंबई पोलिसांकडून दोघांना ठोकल्या बेड्या

महाराष्ट्रातील कारागृहांत चाललंय तरी काय? कळंब्यात पुन्हा 10, भंडा-यात 1 मोबाईलसह बॅटरी जप्‍त

Loksabha Election: निलेश लंकेंच्या कार्यकर्त्यांकडून एका कुटुंबाला मारहाण? सुजय विखेंचा आरोप; नगरमध्ये राजकारण तापलं!

Today's Marathi News Live : दादर रेल्वे स्थानकातील अमरावती एक्स्प्रेसला किरकोळ आग

SCROLL FOR NEXT