हिंगाेली : हिंगोली (hingoli) शहर पोलिसांनी हिंगोली शहरातील मौलवींची बैठक बोलावत अजान (azan) देताना भाेंग्याचा (loudspeaker) आवाज कमी करण्याची विनंती वजा सूचना आज पाळण्यात आल्याचे चित्र हाेते. आज सकाळी हिंगोली शहरात नियमीत देण्यात येणाऱ्या अजानच्या आवाजाची तीव्रता कमी करण्यात आली हाेती. दरम्यान कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलिसांनी (police) दिलेल्या सूचनांचे मुस्लिम धर्मगुरुंनी पालन केल्याने पाेलीसांनी त्यांचे आभार मानले. (hingoli latest marathi news)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (mns) प्रमुख राज ठाकरे (raj thackeray) यांनी आजपासून मशिदीवरील भोंगे न काढल्यास हनुमान चालीसा पठण करण्याचे आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना दिल्याने राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर हिंगोली पोलिसांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी वेगवेगळी पावले उचलण्यास सुरूवात केली. हिंगोली शहर पोलिसांनी हिंगोली शहरातील मुस्लिम मौलवींची बैठक बोलावत अजान देताना भाेंग्याचा आवाज कमी करण्याच्या विनंती वजा सूचना दिल्या हाेत्या. त्याचे पालन मुस्लिम धर्मगुरुंनी केले.
दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून हिंगोली पोलिसांनी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी फिक्स बंदोबस्त पॉईंट देखील उभे केले असून स्वतः पोलिस अधीक्षक राकेश कलासागर (rakesh kalasagar) व अतिरिक्त पोलिस अधीक्षक यशवंत काळे (yashwant kale) हे शहरात पेट्रोलिंग करत बंदोबस्तावर असणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना देत आहेत.
Edited By : Siddharth Latkar
मनसेच्या वतीने आज शहरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. हिंगोली शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या धडवाई हनुमान मंदिरात मनसे कार्यकर्ते एकत्रित येणार असून तेथेच महाआरती करणार आहेत. यामध्ये शहरातील हिंदू बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन मनसेचे जिल्हाध्यक्ष बंडू कुटे यांनी केले आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.