सोलापुर : मशिदी समाेर अथवा शहरात हनुमान चालिसा (hanuman chalisa) लावण्यावरुन राज्यातील बहुतांश जिल्ह्यात आज (बुधवार) मनसेचे (mns) कार्यकर्ते आणि पाेलीस दल (police) यांच्यात खटके उडू लागलेत. साेलापूर (solapur), धुळे (dhule), हिंगाेली (hingoli), पिंपरी चिंचवड (pimpri chinchwad) येथे पाेलीसांनी मनसे प्रमुख राज ठाकरे (raj thackeray) यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. (raj thackeray latest marathi news)
सोलापुरात मनसेच्यावतीने मशिदीसमोर हनुमान चलीसा लावण्याचा प्रयत्न झाला. पोलिस आणि मनसे कार्यकर्त्यात वादावादी झाली. पोलिसांनी मारुती मंदिरातील यंत्रणा जप्त केली. सोन्या मारुती मंदिरात हा प्रकार झाला.
मनसेचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सचिन चिखले पोलिसांच्या ताब्यात
निगडी गावठाणातील हनुमान मंदिरावर हनुमान चालीसा लावण्यासाठी भोंगे लावत असताना निगडी पोलिसांनी चिखलेसह चार जणांना ताब्यात घेतले.
हिंगाेलीत कार्यकर्ते पाेलीसांच्या ताब्यात
महाआरतीला येणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तीन पदाधिकाऱ्यांना कळमनूरी पोलिसांनी ताब्यात घेतले. कळमनुरी हद्दीत अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये मनसेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद बांगर यांच्यासह दोघांना ताब्यात घेतले आहे.
मनसैनिकांनी धुळ्यात केला राज्य सरकारचा निषेध
धुळे शहरात विविध ठिकाणी मनसे कार्यकर्त्यातर्फे भोंग्यावरून हनुमान चालीसा पठण करण्यापूर्वीच पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात. शहरातील विविध ठिकाणाहून मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात. मनसे कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनाची दडपशाही असल्याचा केला आरोप. राज्य सरकारच्या विरोधामध्ये मनसे कार्यकर्त्यांनी केली तीव्र घोषणाबाजी.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.