HIjab : 'जातीय सलोखा राखण्यास कर्नाटक सरकार अपयशी; कर्नाटकात राष्ट्रपती राजवट लागू करा' Saam TV
महाराष्ट्र

HIjab : 'जातीय सलोखा राखण्यास कर्नाटक सरकार अपयशी; कर्नाटकात राष्ट्रपती राजवट लागू करा'

कर्नाटकात यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची दोन वेळा विटंबना झाली आहे. टिपू सुलतान यांच्या विषयी वादग्रस्त विधाने करण्यात आली आहे.

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली : कर्नाटक राज्यातील उडपीमध्ये मुस्लिम समाजातील कॉलेजच्या विद्यार्थिनींना हिजाब (Hijab) घालण्यावरून मोठा वाद उफाळला आहे. आता या वादात हिंदुत्ववादी संघटना उतरल्याने त्याला वेगळे वळण लागले आहे.

हिजाब घालण्यास विरोध करणाऱ्या स्थानिक भाजप आणि विश्व हिंदू परिषदेच्या (BJP and Vishwa Hindu Parishad) गावगुंड कार्यकर्त्यांवर तात्काळ कारवाई करावी, कर्नाटकात यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांची दोनवेळा विटंबना झाली आहे. टिपू सुलतान यांच्या विषयी वादग्रस्त विधाने करण्यात आली त्यामुळे कर्नाटक सरकार (Karnataka Goverment) हे राज्यात जातीय सलोखा राखण्यास अपयशी ठरल्याने सरकार बरखास्त करून त्याठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी एमआयएम पक्षाच्यावतीने राष्ट्रपतींना करण्यात आली.

याबाबतचे निवेदन सांगली जिल्हा अध्यक्ष डॉ. महेशकुमार कांबळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना देण्यात आले. यावेळी MIM पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Garba Special Blouse Designs: नजरेत भरेल असं सौंदर्य! गरब्यासाठी लेहेंग्यावर उठून दिसतील असे 5 बॅकलेस ब्लाऊज

भाजपला मोठा धक्का! गोपीचंद पडळकरांचा उमेदवारी अर्ज रद्द; राजकारणात खळबळ|VIDEO

Maharashtra News Live Update : नवी मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट! स्वतःचं धरण असूनही शुक्रवारपासून १०% कपात

Kidney health: तुमच्या किडनीला होऊ शकतो धोका; या ७ वाईट सवयी आताच सोडा, अन्यथा...

शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारचा मास्टर प्लॅन; जिल्हाधिकाऱ्यांवर मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT