Milind Ekbote Controversial Statement on Jersey Cow Milk saamtv
महाराष्ट्र

Milind Ekbote: जर्सी गायींच्या दुधामुळे नपुंसकता येते; मिलिंद एकबोटेंचा अजब दावा

Milind Ekbote Controversial Statement on Jersey Cow Milk: हिंदुत्त्ववादी आणि महाराष्ट्र गोसेवा संघाचे कार्यकर्ते मिलिंद एकबोटे यांनी जर्सी गायीच्या दूधावरून अजब दावा केलाय. जर्सी गाय ही डुक्कर आणि काढवाच्या संयोगातून निर्माण झालेला प्राणी असल्याचंही त्यांनी पुण्याच्या कार्यक्रमात विधान केलंय.

Bharat Jadhav

  • जर्सी गाय डुक्कर आणि काढवाच्या संयोगातून निर्माण झालीय.

  • पुण्यातील कार्यक्रमात अजित पवारांवरही टीका

  • विधानामुळे राजकीय आणि सामाजिक वाद निर्माण

हिंदुत्त्ववादी आणि महाराष्ट्र गोसेवा संघाचे कार्यकर्ते मिलिंद एकबोटे हे वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. आता मिलिंद एकबोटे आपल्या अजब दाव्यामुळे चर्चेत आलेत. जर्सी गाय ही डुक्कर आणि काढवाच्या संयोगातून निर्माण झालेला प्राणी. या गायीच्या दुधामुळे नपुसंकता निर्माण झाली, असा अजब दावा एकबोटे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात केलाय. त्यांचा दावा ऐकून अनेकांची डोके चक्रावलेत. पुण्याच्या या कार्यक्रमात त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही खालच्या भाषेत टीका केलीय.

यावेळी बोलताना मिलिंद एकबोटे यांनी देशी गायींचे संगोपन आणि संवर्धन यावर भाष्य केलं. याच विषयावर बोलत असताना जर्सी गायींचे दूध आरोग्यासाठी योग्य नाही. या गायींच्या दुधामुळे नपुंसकता आलीय असा अजब दावा एकबोटेंनी केलाय. ‘भारतातील गायीचे आज अर्जेंटिना, ब्राझील आणि ऑस्ट्रेलिया या तीन देशांमध्ये संगोपन केलं जातं.

याद्वारे मोठा दुग्ध व्यवसाय निर्माण केलाय. या तीन देशांमध्ये फक्त भारतीय गाईच्या दूध विक्रीचा कायदा केलाय. तिथे जर्सी गायचे दूध विकण्यास परवानगी नाहीये. पण भारतात या उलट परिस्थीती आहे, भारतात जर्सी गायीचे दूध विकलं जातं. जर्सी गाय डुक्कर आणि गाढवाच्या संयोगातून निर्माण झालेला गायवर्गीय प्राणी आहे. जर्सी गायीच्या दुधामुळे डायबिटीससारखे आजार होतात. डायबिटीसपेक्षा या दुधामुळे नपुंसकता निर्माण झालीय. जर्सी गायीच्या दूधामुळेच पुणे शहरात टेस्टी ट्यूब बेबीचे कारखाने निघालेत, असं विधान मिलिंद एकबोटे यांनी केलंय.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी “मला कुरेशी लोकांवर अन्याय झाल्याचे चालणार नाही” असे बेजबाबदारपणाचे वक्तव्य केलं असल्याचं म्हणत मिलिंद एकबोटे यांनी अजित पवार यांच्यावर टीका केलीय. अजित पवार यांना मोदींचा आशीर्वाद मिळाला आणि त्यांना उपमुख्यमंत्रिपद मिळालंय. , याची जाणीव पवारांनी ठेवावी. भगव्याचा मान राखून हिंदुत्वाची जाण राखली पाहिजे. मिलिंद एकबोटे यांच्या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून या उत्तर दिलं जातं हे औत्सुक्यांच ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बाप्पा पावलाच म्हणावं लागेल...! कोकणात जाणाऱ्या चाकरमन्यांसाठी आनंदाची बातमी; लोणेरे पूल वाहतुकीसाठी खुला

Maharashtra Live News Update: अकोला- हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा जागीच ठार

Disha Patani: 'रेड चिली' दिशा पटानीचा हॉट लूक

Pune News:पुण्यातील वाहतूक कोंडी काही सुटेना; नागरीक त्रस्त, प्रशासन मात्र सुस्त|VIDEO

Shaniwar Wada: पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाड्याचा रंजक इतिहास आणि मनोरंजक गोष्टी जाणून घ्या

SCROLL FOR NEXT