MLA Parinay Fuke : पावसाळ्यातील बेडकांशी जरांगे पाटील यांची तुलना, भाजप आमदारांच्या वक्तव्याने वाद पेटणार

Maharashtra Political News : भाजप आमदार परिणय फुके यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केल्याने निवडणुकीपूर्वी राजकारण पेटण्याची चिन्हे आहेत.
MLA Parinay Fuke : पावसाळ्यातील बेडकांशी जरांगे पाटील यांची तुलना, भाजप आमदारांच्या वक्तव्याने वाद पेटणार
Maharashtra PoliticalSaam Tv
Published On
Summary
  • परिणय फुके यांनी मनोज जरांगे पाटलांवर निवडणुकीपूर्वी राजकीय हेतूने आंदोलन केल्याचा आरोप केला.

  • जरांगे पाटील हे ओबीसी आणि मराठा समाजात मतभेद निर्माण करत असल्याचं फुके यांचं मत.

  • फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने २३७ जागा जिंकल्याचा उल्लेख.

  • ओबीसींचं मंत्रिमंडळातील प्रतिनिधित्व योग्य असल्याचं फुके यांचं विधान.

महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात निवडणुकीची चाहूल लागताच आरोप-प्रत्यारोपांच्या मालिकेला पुन्हा एकदा जोर चढला आहे. भाजप आमदार परिणय फुके यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर तीव्र शब्दांत हल्लाबोल करत, त्यांच्या आंदोलनामागील हेतू आणि त्यांची राजकीय भूमिका उघड केल्याचा दावा केला आहे.

काय म्हणाले परिणय फुके?

माध्यमांशी बोलताना फुके म्हणाले,"जसा पावसाळा आला की मेंढकं बाहेर पडतात, तसंच निवडणुका आल्या की जरांगे पाटील बाहेर पडतात." त्यांच्या मते, जरांगे पाटील सध्या ज्या प्रकारची विधाने करत आहेत, त्यातून हे स्पष्ट होतं की त्यांचा उद्देश मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याचा नसून ओबीसी आणि मराठा समाजात भांडण लावण्याचा आहे. त्यांनी वर्षभरात विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या दरम्यान घेतलेल्या भूमिका केवळ स्वतःची राजकीय पब्लिसिटी करण्यासाठी असल्याचा आरोपही त्यांनी केला.

MLA Parinay Fuke : पावसाळ्यातील बेडकांशी जरांगे पाटील यांची तुलना, भाजप आमदारांच्या वक्तव्याने वाद पेटणार
Parinay Phuke Accident : भाजपचे माजी मंत्री डॉ.परिणय फुके यांच्या कारला भीषण अपघात; थोडक्यात वाचला जीव

फुके यांनी असा दावा केला की, एकेकाळी मराठा समाजाचा मोठा पाठिंबा जरांगे पाटलांना होता, मात्र आता हा पाठिंबा ओसरत चालला आहे. "मराठा समाजालाही हे उमगले आहे की जरांगे पाटील हे केवळ समाजात तेढ निर्माण करण्याचं काम करतात. त्यांच्या मागे कोणते राजकीय हितसंबंध आहेत, हे आता लोकांना कळून चुकले आहे. परिणामी त्यांची विश्वासार्हता संपुष्टात आली आहे," असं ते म्हणाले. तसेच, निवडणुकीच्या काळात ते करत असलेल्या आरोपांना काहीही तथ्य नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

भाजप आमदारांनी पुढे सांगितलं की, जरांगे पाटलांनी त्यांच्या काही आंदोलनांमध्ये संपूर्ण महाराष्ट्राला वेठीस धरलं आणि केवळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुकीत २३७ जागा जिंकल्या गेल्या आणि त्यामुळे मराठा, ओबीसी तसेच अल्पसंख्यांक समाजात त्यांची लोकप्रियता वाढली, हे विसरता येणार नाही.

MLA Parinay Fuke : पावसाळ्यातील बेडकांशी जरांगे पाटील यांची तुलना, भाजप आमदारांच्या वक्तव्याने वाद पेटणार
Parinay Fuke News | मराठा आरक्षणाला विरोध नाही,पण... परिणय फुके काय म्हणाले?

ओबीसी समाजाच्या प्रतिनिधित्वाविषयी बोलताना फुके म्हणाले की, महाराष्ट्रात जवळपास ६० टक्के लोकसंख्या ओबीसींची आहे, तर देशात ही संख्या ५० टक्क्यांच्या वर आहे. त्यामुळे ओबीसींना मंत्रिमंडळात स्थान मिळणं स्वाभाविक आहे. "ज्यांना या वास्तवाची जाणीव नाही, तेच ओबीसी मंत्र्यांच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात," असा टोला त्यांनी हाणला.

MLA Parinay Fuke : पावसाळ्यातील बेडकांशी जरांगे पाटील यांची तुलना, भाजप आमदारांच्या वक्तव्याने वाद पेटणार
Parinay Fuke | 'उद्धव ठाकरे यांची सेना नक्कीच संपेल' - परिणय फुके

फुके यांच्या या वक्तव्यांमुळे निवडणुकीपूर्वीच्या राजकीय वातावरणात आणखी चुरस वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मराठा आरक्षण, ओबीसी प्रतिनिधित्व, प्रादेशिक विकास आणि सुरक्षाविषयक पावलं या सर्वच मुद्द्यांवरून आगामी काही दिवसांत राज्याच्या राजकारणात अनेक नवे घडामोडी आणि राजकीय समीकरणे दिसून येणार हे निश्चित आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com