Nagpur Earthquake News  Saam TV
महाराष्ट्र

Nagpur Earthquake : नागपूर शहरात भूकंपाचे सौम्य धक्के, रिश्टर स्केलवर २.५ इतकी तीव्रता; नागरिकांमध्ये घबराट

Nagpur City Earthquake: भूकंपाच्या या धक्यांचा नागपूर शहरावर फारसा परिणाम जाणवत नसल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहन देखील करण्यात आलं आहे.

Satish Daud

पराग ढोबळे, साम टीव्ही नागपूर

Nagpur Earthquake News

राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना नागपुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूर शहराला शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के बसले. महत्वाची बाब म्हणजे, काही भागात हे धक्के जाणवले असले तरी, बहुतांशी लोकांना याविषयीची कल्पनाच नाही.

भूकंपाच्या या धक्यांचा नागपूर शहरावर (Nagpur News) फारसा परिणाम जाणवत नसल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहन देखील करण्यात आलं आहे. भूकंप मापन यंत्रावर २.५ मॅग्नेट्यूड अशी या भूकंपाची नोंद झाली करण्यात आली आहे.

नागपूर शहरातील ५ किलोमीटर परिसरात हे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची नोंद नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीच्या वेबसाईटवर करण्यात आली आहे. नागपुरातील हा भूकंप दुपारी ३.११ मिनिटे ९ सेकंद या वेळेत झाला आहे. या भूकंपाची तीव्रता (Earthquake) उत्तरेस २१.२९ लॅटित्युड, तर पूर्वेस ७९.४४ लांबपर्यंत होती.

महिनाभरापूर्वी अकोल्यात भूकंपाचे धक्के

अगदी महिन्याभरापूर्वी अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये देखील भूकंप झाला होता. या भूकंपाची तीव्रता २.९ रिश्‍टर स्केल नोंदवली गेली. या घटनेमुळे गावकरी चांगलेच हादरून गेले होते.

भूकंप नेमका कशामुळे होतो?

जमिनीच्या आत होणाऱ्या हालचालींमुळे कंपन तयार होते, याला भूकंप असं म्हणता येईल. भूगर्भशास्त्रानुसार, पृथ्वी १२ टेक्टोनिक प्लेट्सवर वसलेली आहे. या प्लेट्स अतिशय संथ गतीने फिरत असतात. कधी-कधी प्लेट्स (खडक) एकमेकांवर आदळतात किंवा त्यांची टक्कर होते. या घर्षणामुळे भूकंपाचे धक्के बसतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Siddharth Malhotra: 'तुम्ही नेहमीच माझ्यासोबत...'; वडिलांच्या निधनानंतर सिद्धार्थ मल्होत्राची पहिली भावनिक पोस्ट

VIDEO: चिमुकल्याच्या कानात तीव्र वेदना, पालकही गोंधळले...; मशीनने तपासल्यावर डॉक्टरही झाले शॉक!

Vastu Tips: तुमच्या किचनमध्ये चुकूनही अशा टाईल्स वापरू नका; घरात कलह होण्याची वाढते शक्यता

Maharashtra Live News Update: पुणे महानगरपालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर कारवाई

Makhana Smoothie Recipe: वजन होईल कमी झटक्यात कमी; पौष्टीक मखाना-फ्रूट प्रोटीन स्मूदीची वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT