Buldhana police raid illegal gambling Saam TV Marathi (AI image)
महाराष्ट्र

शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा पराक्रम! शेतात चालवायचा जुगार अड्डा; पोलिसांनी मध्यरात्री धाड टाकली अन्...

Buldhana Gambling Case : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव ग्रामीण पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकून बेकायदेशीर 'एक्का-बादशहा' जुगार अड्ड्याचा पर्दाफाश केला. या कारवाईत १२ जणांना अटक करण्यात आली असून ८.४३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Namdeo Kumbhar

संजय जाधव, बुलढाणा प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी

Buldhana police raid illegal gambling den : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव ग्रामीण पोलिसांनी शेलोडी शिवारात शिवसेना शिंदे गटाच्या तालुकाप्रमुखाच्या शेतातील शेडवर मध्यरात्री छापा टाकून सुरू असलेल्या 'एक्का-बादशहा' जुगार अड्ड्याचा पर्दाफाश केला. या धडक कारवाईत १२ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. तर पोलिसांनी एकूण ८ लाख ४३ हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

जुगार अड्डा चालवणारा मुख्य आरोपी राजू बघे (रा. पिंप्री गवळी) हा शिवसेना शिंदे गटाचा तालुकाप्रमुख असून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचा जवळचा मानला जातो. कारवाईदरम्यान आरोपी राजू बघे फरार झाला असून, त्याच्यासह एकूण १३ जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या मुख्य आरोपीचा शोध सुरू असून, या प्रकरणाचा पुढील तपास खामगाव ग्रामीण पोलीस करत आहेत.

मध्यरात्री १:४५ वाजता पोलिसांचा छापा:

मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश काशिनाथ कुवारे व त्यांच्या पथकाने ७ ऑगस्ट २०२६ च्या मध्यरात्री १:४५ वाजेच्या सुमारास शेलोडी शिवारातील एका शेतातील टीनशेडवर अचानक छापा टाकला. तेथे आरोपी बेकायदेशीरपणे 'एक्का-बादशहा' नावाचा जुगार खेळताना आणि खेळवताना मिळून आले.

अटक व गुन्हा दाखल आरोपींची नावे:

संजय देवमन शेगोकार (वय ५२, रा. कवठा, ता. बाळापूर)

सुनील राजेंद्र भोजने (वय १९, रा. तिंत्रव, ता. शेगाव)

शुभम दिलीप भोजने (वय २६, रा. तिंत्रव, ता. शेगाव)

अमोल रमेश मुंडाले (वय २७, रा. तिंत्रव, ता. शेगाव)

सचिन मधुकर मोहाडे (वय ३०, रा. शेलोडी, ता. खामगाव)

प्रभाकर सुखदेव तायडे (वय ४६, रा. शेलोडी)

नंदकिशोर प्रल्हाद आरे (वय ५१, रा. शेलोडी)

नासीर खाँ बशीर खाँ (वय ४०, रा. शिवपुरा जामोद, ता. जळगाव जामोद)

आकाश वसंता हांडे (वय ३०, रा. लोनखेल जामोद, ता. जळगाव जामोद)

निवृत्ती भगवान हिंगणे (वय ३४, रा. तिंत्रव, ता. शेगाव)

शेख राजीक शेख शफीक (वय ४५, रा. आवार, ता. खामगाव)

विनोद जनार्धन जाधव (वय ४८, रा. शेलोडी, ता. खामगाव)

सदर जुगार अड्डा पिंप्री गवळी येथील रहिवासी राजू बघे हा चालवत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. पोलिसांचा छापा पडताच आरोपी राजू बघे (रा. पिंप्री गवळी) हा घटनास्थळावरून फरार झाला. या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश कुवारे यांच्या फिर्यादीवरून खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक २८३/२०२६, महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४, ५ तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ४९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रतीक्षा जाधव यांनी गुन्हा नोंदवला असून, पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल किरण राऊत या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amaal Mallik Break: 'तूर्तास आपली रजा घेतो...'; प्रसिद्ध संगीतकाराचा चित्रपटसृष्टीला रामराम, कारण सांगत म्हणाला...

Weight Loss : वजन झपाट्याने कमी करण्यासाठी रोज एक वाटी प्या 'ही' डाळ, चविष्ट रेसिपी लिहून घ्या

Mumbai Local: मुंबईत धावत्या लोकलमधून तरुणाला ढकललं, किरकोळ वादाचा भयानक शेवट

Banana Vs Dates Benefits: केळी की खजूर? आरोग्यासाठी फायदेशीर काय?

Maharashtra News Live Update: पुण्यातील भोरमध्ये तरुणाची हत्या, चाकूने सपासप वार करत संपवलं

SCROLL FOR NEXT