Police escort notorious criminal Teja after his arrest for shooting his girlfriend in Sambhajinagar’s Kileark area. Saam TV News
महाराष्ट्र

कुख्यात गुंड तेजाचा मैत्रिणीवर गोळीबार, संभाजीनगरात मध्यरात्री थरार | VIDEO

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजी नगर शहरातील किलेअर्क भागात मध्यरात्री गोळीबाराचा थरार पाहायला मिळाला. १० दिवसांपूर्वी जेलमधून जामिनावर आलेल्या तेजाने मैत्रिणीवर गोळीबार केला.

डॉ. माधव सावरगावे

  • कुख्यात गुंड तेजा जामिनावर बाहेर येताच मैत्रिणीवर गोळीबार

  • घटना छत्रपती संभाजीनगरातील किलेअर्क भागात मध्यरात्री घडली

  • ड्रग्ज तस्करी, शस्त्रसाठा, बलात्कारासह १५ गुन्ह्यांमध्ये आरोपी तेजा

  • बेगमपुरा पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन मैत्रिणीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले

Chhatrapati Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगर शहरातील ड्रग्ज तस्करी प्रकरणातील कुख्यात गुन्हेगार फैजल उर्फ तेजा एजाज सय्यद ( रा. किलेअर्क) याने मैत्रिणीवर गोळीबार केला. तिच्या हातात गोळी घुसली आहे. तिच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही धक्कादायक घटना सोमवारी रात्री १२ वाजता किलेअर्क भागात घडली. बेगमपुरा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत आरोपी तेजाला ताब्यात घेतले.

आरोपी तेजा हा आठ ते दहा दिवसांपूर्वी जेलमधून जामीनावर बाहेर आला आहे. फैजल उर्फ तेजा हा अमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणात अनेकदा रेकॉर्डवर आलेला आहे. शस्त्रसाठा, बलात्कार आणि ड्रग्ज तस्करी आदी प्रकरणाचे १५ गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. एप्रिल महिन्यात एका रिक्षा चालकावर कोयत्याने हल्ला केल्यावरून त्याची धिंड काढली होती. त्यानंतर त्याच्यासह त्याच्या संपूर्ण कुटुंबाला एनडीपीएस पथकाने अटक केलेली होती.

सोमवारी त्याची मैत्रीण किलेअर्क भागातील त्याच्या घरी गेली. तिथे दोघांमध्ये वाद झाला. या वादातूनच तेजाने मैत्रिणीच्या दिशेने गोळी झाडली. ही माहिती मिळाल्यावर बेगमपुरा ठाण्याचे निरीक्षक मंगेश जगताप हे पथकासह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तेजाला ताब्यात घेत, जखमी मैत्रिणीला घाटीत दाखल केले आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत. जखमी तरुणी जबाब देण्याच्या परिस्थितीत नव्हती, असे पोलिसांनी सांगितले.

शहरात मागील दहा दिवसांपासून रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा धुमाकूळ सुरू आहे. जमीर सलीम शेख उर्फ कैची या गुन्हेगारांने जेलमधून बाहेर येताच पोलिसांवर हल्ला केला. टिप्या उर्फ जावेद शेख याने तलवारीच्या धाकावर अडीच लाख रुपये लुटले. साईनाथ गायकवाड आणि बब्बी उर्फ निशिकांत शिर्के यांच्या तुफान राडा झाला. आता तेजाने गोळीबार केला. पोलीस या गुन्हेगारांवर वचक ठेवण्यात कमी पडत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai: मुंबईकरांसाठी गुड न्यूड! सांताक्रूझ ते चेंबूर प्रवास सुसाट, फक्त ३५ मिनिटांत पोहचणार

Maharashtra Live News Update: - पुणे आहिल्यानगर महामार्गावर रांजणगाव येथे वाहतुककोंडी

Health Tips: फळं खाल्ल्यानंतर पचण्यासाठी किती वेळ लागतो?

शुभमन गिल ठरला जगातला एकमेव खेळाडू; ICC कडून चौथ्यांदा खास पुरस्कार

Dhule MIM : धुळ्यात एमआयएमला मोठा धक्का; जिल्हा कार्यकारिणीचा सामूहिक राजीनामा

SCROLL FOR NEXT